मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खांदा

सुमारे बावन्न वर्षांपूर्वी तो एका सकाळी कॉलेजमधे लेक्चर घेत होता. नोकरी करता करता सीएस व आयसीडब्लूए पण करत होता. डोळ्यात स्वप्नं होती, खांद्यावर जबाबदारी होती. वर्ग चालू असतानाच शिपाई आत आला व त्यानं त्याला फोन आल्याचे सांगितले. तो त्याच फोनची वाट बघत होता. पलीकडून त्याला अपेक्षित बातमी मिळाली. त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. कसंबसं लेक्चर संपवून त्यानं सासुरवाडीची वाट धरली. काही तासापूर्वी जन्माला आलेल्या त्या बाळाला त्यानं हातात घेतलं. त्या गोड गाठोड्यानं त्याच्या खांद्यावर पडलेल्या आणखी एका जबाबदारीची जाणीव त्याला करून दिली. पण त्याची त्याला फिकीर नव्हती.  व्यावसायिक परीक्षा पास होऊन तो कॉर्पोरेट क्षेत्रात घुसला. तिथे प्रगती करता करता त्याच्या खांद्यावरच्या जबाबदाऱ्या दर दिवशी वाढत गेल्या. घरच्या आघाडीवरही म्हातारे आईवडील, बायको व दोन मुलं अशी जबाबदारी त्याच्या खांद्यावर होतीच.  ह्या सगळ्या गडबडीत तो आमच्यापासून थोडा लांब गेला. आम्हा भावंडांचं भावविश्व हे आई आणि आजीआजोबांभोवतीच फिरत राहिलं. त्याच्या खांद्यावर बसून फिरणं किंवा थोडं मोठेपणी त्याच्या खांद्यावर मित्रत्वाचा ह

कॅलिडोस्कोप

माझ्या आसपास वयाच्या लोकांना विचारलं तर बहुतेक सगळे जण मान्य करतील की लहानपणी मे महिन्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीत कधी ना कधी त्यांनी कॅलिडोस्कोप बनवला आहे. मी तर अनेक वेळा बनवलाय. दुपारच्या उन्हाच्या वेळेला, जेव्हा घरातली मोठी माणसं बाहेर खेळायला जाऊ देत नसत, तेव्हा करायच्या अनेक टाईमपास पैकी हा एक. आरशाच्या तीन पट्ट्या, दोन गोल काचा, एक दुधी काच, पुठ्ठा, मार्बल पेपर, दोरा, डिंक, बांगड्यांचे तुकडे, मणी असे सगळे साहित्य जमवून आम्ही हा कॅलिडोस्कोप बनवायला घ्यायचो. आळीत अनेक जण हा बनवायचे. त्यातून मग कुणाचा कॅलिडोस्कोप जास्त भारी, वेगवेगळे आकृतीबंध दाखवतो, त्याची चढाओढ लागे. संपूर्ण सुट्टीभर मग हा कॅलिडोस्कोप आमच्या दिमतीला असायचा. परवा काहीतरी शोधत असताना अचानक एक कॅलिडोस्कोप सापडला. कधी बनवला होता ते काही आठवेना पण इतक्या वर्षानंतर सुद्धा सुस्थितीत होता. मी उजेडाकडे रोखून कॅलिडोस्कोप फिरवायला सुरुवात केली. काय वेगवेगळे पॅटर्न दिसत होते, वा....  काही सुरेख होते, काही नव्हते. काही अगदी साधे होते, तर काही खूपच गुंतागुंतीचे. काही वेळा वाटलं की जरा अजून थोडं वेगळं असतं तर जास्त छान दि