मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बापू

बापू..... नक्की कोण होता हे मला आजतागायत माहिती नाहीये. पण बहुधा शेतकरी असावा.  माझ्या आजोळी,  बहुतेक सगळे शेतकरीच होते. त्यामुळे बापूसुद्धा अर्थातच शेतकरी असणार, असा मी अंदाज बांधलाय. मातकट रंगाचं धोतर, तशाच रंगाचा शर्ट व गांधी टोपी, पायात जाड पायताण असा त्याचा वेष असे. मध्यम उंची, किरकोळ अंग, तोंडातले निम्मे दात गायब असा त्याचा अवतार होता. हसला की तोंडाचं अर्ध बोळकं व उरलेले, तंबाकू खाऊन पिवळे झालेले, दात नीट दिसायचे. सुमारे पन्नाशीचा हा काळासावळा माणूस माझ्या आजोबांकडे कशासाठी येत असे हे मला कधीच कळलं नाही. आला की आधी माझ्या आजीकडे जायचा व हक्कानं चहा प्यायचा. कधी तिची काही छोटीमोठी कामं करायचा. मग आजोबांकडे जाऊन, त्यांच्या चांदीच्या डबीतला तंबाकू खायचा. बहुतेक वेळा शेतीसंबंधी काहीबाही बोलत बसायचा. क्वचित काही न बोलता, ओटीवर बसून आकाशाकडे बघत बसायचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी गेलो की हा हमखास भेटायचा. मी, माझी आई, माझा धाकटा भाऊ, असे सगळे जणू त्याचेच पाहुणे असल्यासारखा आनंदून जायचा. माझा भाऊ मला दादा म्हणतो म्हणून बापू पण मला दादा म्हणायचा. कधी आम्हाला नदीवर फिरायला न्यायचा. म

दोघी...

ही पहिली... उच्चशिक्षित. शाळेत असल्यापासूनच खूप हुषार. आता आयटी क्षेत्रातल्या नावाजलेल्या कंपनीमधे नोकरी. भलामोठा पगार.  नवराही अगदी शोभेलसा. शहराच्या उत्तम भागात सुरेखसे घर. दोघांच्याही आपापल्या चारचाकी, दुचाकी गाड्या. घरात काहीही कमी नाही. आज बऱ्याच दिवसांनी छोट्याला घेऊन आईकडे आली होती. आईला एकाच वेळी आश्चर्यही वाटलं होतं, आनंदही झाला होता, पण तिचा चेहरा पाहून जरा शंकेची पालही चुकचुकली होती. चहापाणी झाल्यावर हळूच आईनं विषय काढला आणि तिचा बांध फुटला. "........ लक्ष देत नाही...... रोज उशिरा येतो..... तोही खूप दारू पिऊन....विचारलं तर धड बोलत नाही....कधीमधी हात टाकतो.... बहुतेक बाहेर कुणी एक मैत्रीण असावी.....असं वाटतं की सरळ बॅग उचलावी व तुझ्याकडे निघून यावं....." आईनं नीट ऐकून घेतलं व एकेक पत्ता टाकत समजवायला सुरुवात केली. "......तुझ्या बाबांची इभ्रत........भावाचं स्थान......आम्ही केलेले संस्कार......लोक काय म्हणतील......छोट्याकडे बघून तरी विचार कर......तू सुद्धा काही कमी हट्टी नाहीयेस.....एकट्या बाईचं जगणं........." जन्मदात्या आईच्या कुशीतसुद्धा जागा

बदल

ती एक अनामिक... गेली सुमारे सात आठ वर्षं, माझ्या परतीच्या रस्त्यावर एका विशिष्ट सिग्नलला मी तिला बघतोय.  अगदी पहिल्यांदा पाहिली तेंव्हा चार पाच वर्षांचीच असेल. पाठच्या धाकट्याला हाताशी धरून सिग्नलला थांबलेल्या लोकांकडे पैसे मागत असे. रस्त्याच्या कडेला त्यांची आई आणखी एका तान्ह्याला घेऊन बसलेली असे. काही दिवसांनी दोघं भावंडं एका छोट्या लोखंडी कडीमधून उलट्यापालट्या कसरती करून दाखवू लागले. का कुणास ठाऊक, ती कायम माझ्याकडे प्यायला पाणी मागत असे. कधी कधी मी एखादा बिस्किटाचा पुडाही तिला देत असे. पाणी प्याल्यावर गोड हसून चक्क 'थँक यू हा काका' म्हणायची.  माझा घरापर्यंतचा उरलेला रस्ता तिच्या त्या हसण्याने सोपा होऊन जायचा.  गेली दोन चार वर्षं घरी परतायचा रस्ता बदलल्यामुळे ती दिसली नव्हती. परवा काही कारणाने त्या बाजूला जाणं झालं. मला पाहून पळत पळत आली. चांगलीच मोठी झाली होती.  "पाणी हवंय...?" मी विचारलं.  "नको काका. पुढल्या वेळी याल ना तेंव्हा तुमचा जुना शरट आनाल का?" "हो आणीन हं. पण शर्ट कशासाठी गं...?" "काका, ती गाड्यां

दोन झेन कथा

गेल्या दोन - चार दिवसात काही कारणांनी झेन बुद्धपंथातल्या दोन गोष्टी वाचनात आल्या. या पंथातल्या गोष्टी तशा छोट्याशाच असतात, पण खूप काही शिकवणाऱ्या असतात.  मला आवडलेल्या दोन गोष्टी आज तुमच्याबरोबर शेअर करतोय. तुम्ही कदाचित आधीच वाचल्या असतील. १.  प्रचंड थंडी पडली होती. एक भिक्षू झोपडीच्या बाहेर शेकोटी करून शेकत बसला होता. समोरून एक वाटसरू चालत चालला होता. शेकोटी पेटलीय पाहून थोडा वेळ शेकायच्या इराद्याने तिथे येऊन बसला. काही वेळाने त्याने पाहिले की शेकोटीत लाकूड म्हणून जे घातले होते, ती एक बुद्धाची मूर्ती होती. वाटसरू भडकलाच. तो त्या भिक्षूवर ओरडला, "अरे पाप्या, हे काय करतोयस?" "लाकडातून बुद्धाला मुक्त करतोय." भिक्षू शांतपणे म्हणाला. "अरे मूर्खा, बुद्ध काय असा लाकडात असतो का?" "नाही ना? मग ते लाकूड जाळण्यात पाप कसलं?" २. एक माणूस आपल्या मुलाला शिकण्यासाठी बुद्ध मठात पाठवायचं ठरवतो व त्याला घेऊन मठात येतो. हा मठ व त्यातील गुरु खूप नावाजलेले होते. मठात आल्यावर बघतो तर काय? सगळे शिष्य आपापली कामं किंवा अभ्यास करत होते. गुरुंचेही काही स्

व्रतवैकल्ये : एक विपर्यास

गेले काही दिवस जाता येता विविध हॉटेल्स (विशेषतः मांसाहारी) व धाब्यांच्या 'आखाड पार्टी' संबंधी मोठमोठ्या जाहिराती नजरेस पडत होत्या. कारण स्वच्छ होतं. पुढील काही दिवसात श्रावण महिना सुरु होणार होता. श्रावणात मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असल्यामुळे आत्ताच काय तो कोटा भरून घ्या, नंतर महिनाभर काहीही मिळणार नाहीये, या भावनेने मांसाहारप्रेमी मंडळी मोठ्या उत्साहाने ह्या आखाड पार्ट्यांचा आनंद लुटला. शाकाहारी मंडळी अर्थातच सर्व कोनांमधून नाकं मुरडून घेतली. त्यावर सोशल मीडियावर अनेक विनोद, चुटकुले व व्यंगचित्रे पसरली. आषाढाच्या शेवटच्या दिवसाला 'दिव्याची अमावस्या' म्हणावे का 'गटारी' म्हणावे यावर अनेक भावनाभरीत वादंग झडले. ज्यानं त्यानं आपल्याला हवं तेच केलं व अखेर श्रावण सुरु झाला. ह्या सगळ्या भानगडीत होतंय काय की ह्या व्रतवैकल्यांमागे जी काही शास्त्रीय कारणे आहेत त्याचा शोधच घेतला जात नाही. कारण ही व्रतवैकल्ये पाळणारी जी कर्मठ मंडळी आहेत ती केवळ 'बाबा वाक्यम प्रमाणं' या पद्धतीने त्याचं पालन करत आहेत तर बुद्धीप्रामाण्यवादी त्याचा शोध घेण्याऐवजी केवळ विरोध म्हणून न प

फ्रेंडशिप डे

कशासाठी असतो हो हा? मला आजतागायत कळलंच नाहीये की मित्र आणि मैत्री यासाठी एखादा विशिष्ट दिवस का पाहीजे. शाळेत रोज पाच सात तास एकत्र घालवून नंतर पुन्हा संध्याकाळी दोन तास एकत्र खेळणाऱ्या मित्रांसाठी फक्त एक दिवस? मधल्या सुट्टीत एकमेकांचा डबा आनंदाने शेअर करणाऱ्या मित्रांसाठी फक्त एक दिवस? आठवडाभर एकत्र घालवून सुद्धा रविवारी एकमेकांशिवाय न करमणाऱ्या मित्रांसाठी फक्त एक दिवस? मित्र बाहेरच्या जगात कोणी का असेना, भेटल्यानंतर त्याला मूळ नावाने हाक मारून, त्याला जमिनीवर आणणाऱ्या मित्रांसाठी फक्त एक दिवस? कितीही मोठे गॅझेटेड अधिकारी झालात तरी तुम्ही वामन्या आणि भद्र्याच, बोटीवर कॅप्टन असलास तरी तू लल्ल्याच, मोठ्या कंपनीचा सर्वोच्च अधिकारी असलास तरी तू विन्याच, कितीही मोठा आयएसओ ऑडिटर असलास तरी तू अवध्याच, सीए होऊन एखाद्या मोठ्या फर्मचा पार्टनर असलास तरी तू लिंब्याच, प्रसिद्ध डॉक्टर झालास तरी तू आमच्यासाठी डम्ब्याच..... शाळा संपली, मार्ग बदलले, वर्षावर्षात गाठभेट पडत नाही, पण कधीही भेटलो तरी 'काय रे लिंब्या' म्हणणाऱ्या मित्रांसाठी फक्त एक दिवस? मैत्रिणीशी बोलत असताना, 'ए

श्रेय का हो देईना....

 सध्याच्या काळात व्हॉट्स ऍप्प हा आपल्या दिवसाचा एक अविभाज्य घटक बनला आहे, यात वाद नाही. हे असं असणं चांगलं का वाईट हा माझा मुद्दा नाहीये. मला आज एक वेगळाच विचार मांडायचा आहे. दिवसभरात आपल्याला अनेक सुंदर, सुंदर कविता, लेख, फोटो, चित्र येत असतात. काही वेळा त्या कवीचे, लेखकाचे वा चित्रकाराचे नाव खाली लिहीलेले असते, पण बहुधा नसते. बहुतांशी हे सर्व मेसेज आपल्या परिचितांनी फॉरवर्ड केलेले असतात. आपल्या ह्या परिचितांनासुद्धा ते कुणीतरी फॉर्वर्डच केलेले असतात. बरं हल्ली व्हॉट्स ऍप्पवाल्यांनी सुधारणा केल्यामुळे असला मेसेज हा फॉरवर्ड केलेला आहे, हे ही लगेच कळू शकते. पण कुठेतरी, कुणीतरी एक पहिला असणारच. अनेकवेळा जेंव्हा अशा मेसेजेसच्या खाली मूळ निर्मात्याचे नाव नसते, त्यावेळी ह्या पहिल्यांदा फॉरवर्ड करणाऱ्याला शोधून, खडसावून विचारावेसे वाटते की मूळ निर्मात्याला श्रेय न देण्यामागचा तुझा हेतू तरी काय? कारण जो पहिल्यांदा फॉरवर्ड करत असेल, त्याचा मेसेज 'फॉर्वर्डेड' नसणार. तो जणू काही त्याचा स्वतःचाच असणार. माझा रत्नागिरीला राहणारा एक मित्र असेच काही छान छान लिहीतो व फेसबुक अथवा व्हॉट्स ऍ