मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बाप

त्याचं नाव कबांगा. नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की तो कुठला. काळाकभिन्न, उंचापुरा पण शिडशिडीत, जन्मल्या जन्मल्या म्हशीनं पाय दिल्यासारखं चपटं नाक, जाडजूड ओठ, कुठल्याही टूथपेस्ट किंवा टूथपावडरच्या जाहीरातीत शोभतील असे पांढरेशुभ्र दात, जीन्स व टी शर्ट घातलेला हा साधारण तिशीचा इसम त्याच्या देशातल्या एका कंपनीच्या गेस्ट हाऊसचा सर्व काही होता. सर्व काही म्हणजे स्वयंपाकी तोच, भांडी घासणारा तोच, कपडे धुऊन इस्त्री करणारा तोच, झाडणार पुसणार तोच, वॉचमनही तोच आणि माळीही तोच. ही सगळी कामं करून मागल्या बाजूला एका खोपटवजा खोलीत तो एकटा रहायचा. सदैव हसतमुख. कधीही कंटाळलेला किंवा वैतागलेला दिसायचा नाही. काम करताना सतत काहीतरी गुणगुणत असायचा. ऱ्हिदमचा खूप चांगला अंदाज होता. एकदा मी लॅपटॉपवर 'झिंगाट' मधलं गाणं लावलं होतं त्यावर सुरेख नाचला. नंतर चार दिवस रोज तेच गाणं.  हे सगळं घडलं, मी एकदा त्याच्या देशात, त्याच्या कंपनीत काही कामासाठी गेलो होतो तेव्हा. भल्या मोठ्या गेस्ट हाऊसमधे मी एकटाच होतो. त्यामुळे मला वेळ असेल तेंव्हा आम्ही दोघं खूप गप्पा मारायचो. कबांगा बऱ्यापैकी शिकलेला होत

शरद

शरद.... तसा माझा कुणीच नव्हता. माझ्या आजोबांच्या मित्राचा, तात्यांचा, तो मुलगा. एकुलता एक. माझ्यापेक्षा खूपच मोठा. जवळजवळ माझ्या वडलांच्या वयाचा. पण आसपासचे सगळे त्याला नुसतं शरद म्हणायचे म्हणून आम्हीपण त्याला, नावापुढे काका, मामा वगैरे न जोडता, नुसतं शरद म्हणायचो. तात्या एलआयसी मधून मोठ्या पदावरून निवृत्त झाले होते. बऱ्यापैकी पेन्शन मिळत असावं. बायको खूप आधीच वारली होती. घरी फक्त तात्या आणि शरदच असायचे. 'घरी असायचे' हा मात्र कोड्यात टाकणारा प्रकार होता. तात्या रिटायर झाल्यामुळे घरी असायचे यात काही विशेष नव्हते. पण शरदही? आमच्या घराच्या चार घरं पलीकडेच तात्यांचं घर होतं. सकाळपासून रात्रीपर्यंत बघावं तेंव्हा शरद ओसरीवर, पट्टेरी कापड लावलेल्या लाकडी आरामखुर्चीवर बसलेला असायचा. बरं घरी आहे म्हणून घरच्या कपड्यात बसावं ना. पण हा, सकाळी सकाळी दाढी अंघोळ करून, पूर्ण सुटात, टाय लावून, डोक्यावर हॅट घालून बसलेला असायचा. कधीही बघा, शरद असाच दिसणार. काहीही काम करताना, वाचन करताना अथवा रेडिओ वगैरे ऐकताना दिसायचा नाही. कुणाशी बोलताना दिसायचा नाही. फक्त खुर्चीवर बसून रस्त्याकडे बघत असायचा

अप्पा

आपल्या आजूबाजूला अनेक माणसं असतात. त्यातली काही हुशार असतात, काही ढ असतात, काही कर्तबगार असतात, काही कुचकामाची असतात, चांगली असतात, वाईट असतात आणि काय काय. पण काही माणसं अशी असतात की ती काहीच नसतात. त्यांच्याबद्दल कुणालाच काही वाटत नाही. अप्पा त्यातलाच. तो काहीच नव्हता. कुणालाच त्याच्याबद्दल काही वाटत नसे..... तसं पहायला गेलं तर माझा लांबचा मामा लागायचा. इतका लांबचा की माझ्या आजीच्या भाषेत, 'एसटीनं दोन तास लागतील', इतका लांबचा. वाडवडीलांची सावकारी होती. त्यामुळे घरचं गडगंज होतं. चार पाच भाऊ होते. तीन चार बहिणी होत्या. अप्पा असातसा मधलाच. एवढ्या मोठ्या पसाऱ्यात अप्पा शाळेत गेला का, काही शिकला का, असा कुणालाच प्रश्न पडला नाही. अप्पा नुसता बसून असे. अगदीच काही काम सांगितलं तर करायचा, पण इतर वेळी निवांत बसून असायचा. कुणालाच त्याचं काही वाटत नसे.... कुठल्याही रंगाचा, जुन्या पद्धतीचा लॉंग शर्ट, घोळदार पायजमा, डोक्यावर चेपून बसवलेली गांधी टोपी, चार दिवसांचे वाढलेले दाढीचे खुंट, बसून खाल्ल्यामुळे किंवा खाऊन बसल्यामुळे सुटलेलं तोंद असा त्याचा अवतार होता. एव्हढा सावकाराचा मुलगा, अ

व्रतवैकल्ये : एक विस्तार

सुमारे महिन्यापूर्वी मी 'व्रतवैकल्ये : एक विपर्यास' या मथळ्याचा ब्लॉग लिहिला होता.  यात पत्री गोळा करण्याच्या पद्धतीबद्दल मी माझी मते व्यक्त केली होती. त्यावर अनेक प्रतिक्रिया पण आल्या. पण त्यातून मूळ विषयाचे निराकरण झाले नव्हते. परवा माझ्या एका ग्रुपमधील श्री. सुधीर लिमये यांनी एक माहीती फॉरवर्ड केली, ज्यातून कदाचित थोडीफार उकल होईल असे वाटते. आधीचा ब्लॉग या लिंकवर वाचा. https://chamanchidi.blogspot.com/2018/08/blog-post_9.html एकवीस पत्री.. आषाढ श्रावण मनोमिलन, पत्री पुष्प संमेलन। 1) तुळस मंजिरी गोजिरी, प्राणवायू दायिनी। 2) श्वेत दुर्वा..हरित दुर्वा, चर्मरोगांना म्हणती दूर व्हा.। 3) कुंतल पोषक रस माका, त्याला कधी दूर सारू नका। 4) बेल. डावे पान ब्रह्माचे, उजवे पान विष्णू चे, पण त्रिदल करी नाश त्रिदोषांचे। 5) बोर..बदरी.. ओकारी, उमासे मळमळ अंतरी, सेवन करावी नटखट बदरी। 6)धोतरा..    . गुंगी आणतो हा धोतरा, जनहो जरा जपून वापरा। 7) पिंपळ..      कावीळ, वाचा दोषांवर गुणकारी, सदैव सळसळ, जणू वाजवी बासरी। 8) मधुमालती..   . नाजूक गुलाबी मधुमालती, गुडघे, सांधे रक

दामलेमास्तर

हो...! तोच तो मी दामलेमास्तर. 'बिगरी ते मॅट्रीक' मधला. माझ्या शिष्योत्तमानं, पुरुषोत्तमानं, ज्याच्यावर पानंच्या पानं खर्चली तो मीच. मीच तो सुलतान. मीच तो कर्दनकाळ, औरंगजेब, हरणटोळ. मीच तो पोरांना झोडून काढणारा. मीच तो पोरींना कावळे वगैरे म्हणणारा. मान्य आहे मला की कदाचित माझ्याकडून हे सगळं अति झालं असेल, पण आज थोडीशी माझीही बाजू समजून घ्या. तुम्ही म्हणाल, मास्तर आज इतक्या वर्षांनी तुम्हाला कशी काय उपरती झाली? सांगतो. परवाच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कुणीतरी गमतीत का होईना मला व माझे सहकारी चितळेमास्तर यांना उद्देशून एक पोस्ट टाकली. (आम्हीही हल्ली 'वर' बसून सगळं बघतो बरं). म्हणलं त्यानिमित्तानं इतक्या वर्षांत राहून गेलेलं बोलून घ्यावं. कोकणातल्या एका छोट्याशा खेड्यात माझा जन्म झाला. कोकणातल्या कुणाकडेही असत त्याप्रमाणे घरी थोडी कलमं, काजू, फणस होते. अर्ध्या खंडीची शेती होती. वडील साधे क्रमपाठी भिक्षुक होते. सहा बहीणी व तीन भाऊ धरून घरात आम्ही बारा चौदा तोंडं. खेड्यातले चार पाच यजमान व शंकराची रोजची पूजा यावर दोन वेळचं कसंबसं मिळायचं. अशा परिस्थितीत मॅट्रीक होऊन मी त