मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दोन ओंडक्यांची होते... (उत्तरार्ध)

पुलंनी एके ठिकाणी म्हणलंय की युनिफॉर्म घातला की साधा बॅंडवालापण टर्रेबाजी करतो. माझेही बहुतांशी अनुभव तसेच आहेत. आता युनिफॉर्म घातल्यामुळे टर्रेबाजी करायला हुरूप येतो का विशिष्ट काम करताना येणाऱ्या अनुभवांमुळे तसं वागलं जातं हा वेगळा विषय आहे. बट फॅक्ट रिमेन्स. मात्र अपवादात्मक का होईना, युनिफॉर्म मधल्या काही चेहऱ्यांबद्दलच्या माझ्या आठवणी पुष्कळ वेगळ्या आहेत. आठवणींच्या वादळात कितीतरी ओंडके आज एका लाटेनं जवळ येताहेत व दुसऱ्या लाटेनं लांब जाताहेत. लहानपणापासून ज्याची आपल्याला भीती घातली जाते तो पहिला युनिफॉर्म म्हणजे पोलीस. गप जेव नाहीतर पोलिसाला बोलवीन, या व अशा अनेक धमक्या आपण ऐकलेल्या असतात. त्यामुळे कुठेही पोलीस दिसला की पोटात बाकबुक होतंच. त्यात चित्रपटांमधे पाहिलेले पोलीस यात आणखी भरच घालतात. नंतरच्या काळात काही पोलीस मित्रही झाले, तसेच काही वर्गमित्र पोलीस झाले. त्यामुळे नाण्याची दुसरी बाजूही कळली. पण जो पोलीस माझ्या लक्षात आहे तो खूप वेगळा आहे. ह्या पोलिसाला मी पाहिलं त्याकाळी हवालदार मंडळी हाफ पॅन्ट व पठाणी सॅंडल घालून, पोटऱ्यांना खाकी रंगाच्या पट्ट्या गुंडाळत असत. सुट्टी

दोन ओंडक्यांची होते...

लहानपणापासून माणसांचं निरीक्षण करण्याचा मला छंदच आहे. वेगवेगळी माणसं, त्यांचे हावभाव, लकबी, वेषभूषा यांचं निरीक्षण करून विविध वैशिष्टयांच्या मनात नोंदी करत रहाणं हा माझा एक आवडता टाईमपास आहे. गेले बरेच आठवडे मी अशा वेगवेगळ्या व्यक्तींबद्दल लिहीत होतो. मागल्या आठवड्यात नुसत्या चेहऱ्यांबद्दल लिहिले. असे चेहरे की ज्या मागचा 'माणूस' मला माहीत नाहीये, पण जे मी अनेक वेळा पाहीले होते. काही चेहरे मात्र असे आहेत की जे मी एकदाच पाहीलेत आणि दोनशे टक्के ते चेहरे पुन्हा मी कधीही पाहणार नाहीये. हे चेहरे एकदाच दिसण्याचं मुख्य व एकमेव कारण म्हणजे ह्या चेहऱ्यांना मी प्रवासात भेटलोय. सुमारे पाच मिनिटांपासून अठरा वीस तासापर्यंतचाच सहवास. पण काही ना काही कारणानं हे चेहरे व त्यामागचा माणूस, माझ्या आठवणींच्या विश्वात अढळ स्थान मिळवून बसलेत. ह्या यादीत सर्वप्रथम येतो सायकलवरून जाणारा एक मध्यमवयीन गृहस्थ. मी व माझा मित्र काही कारणानं मोरगावमार्गे बारामतीला चाललो होतो. त्याकाळी माझ्याकडे सेकंडहँड फियाट होती. मोरगाव मागे टाकून पुढे निघालो, तेवढ्यात दोन गचके खाऊन गाडी बंद पडली. बरीच खाडखूड करूनही चालू

भंवताल

दोन तीन दिवसांपूर्वी एका शब्दप्रयोगाबद्दल काही शंका होती म्हणून नेटवर सर्फिंग करत होतो. त्या भानगडीत एक वेगळीच माहिती हाताला लागली. ती अशी की, सर्वसामान्यपणे एक माणूस त्याच्या आयुष्यात तीस लाख चेहरे बघतो. त्यातील जास्तीत जास्त तीन हजार चेहरे माणसाच्या लक्षात राहतात. जी माणसं लोकांमध्ये वावरतात ती तर जवळजवळ साडेचार कोटी चेहरे बघतात म्हणे. आता नेटवर काय, कुठल्याही विषयावर काहीही माहिती मिळते. पण ह्या माहितीच्या तुकड्याने माझ्या डोक्यात मात्र विनाकारण चक्र फिरवायला सुरुवात केली. सगळ्यात मोठा गोंधळ झाला तो असा की आपल्या लक्षात नक्की राहतं काय? चेहरे की माणसं? जास्त विचार केल्यावर असं लक्षात आलं की चेहरा ही कुठल्याही माणसाची आयडेंटिटी असते. विशिष्ट चेहऱ्यामुळेच विशिष्ट व्यक्ती आपल्या लक्षात राहतात. बघा ना, केवळ चेहऱ्यामुळेच आपल्याला माधुरी दीक्षित आणि मायावती यांच्यातला फरक कळतो. तसं नसतं तर.... अरे बापरे.... ह्या सगळ्या विचारांच्या गर्दीत मी एकेक चेहरे आठवू लागलो. काय काय प्रकार सापडले बघा. आईवडील, नातेवाईक, शेजारपाजारचे, गल्लीतले, सोसायटीतले,  शाळाकॉलेजमधले, ऑफिसमधले, विविध दुकानदार,

वेव्हलेंग्थ

 आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला एखादा माणूस असा भेटतो की ज्याला आपण आधी कधी पाहिलेलंही नसतं. पण काही वेळातच वर्षानुवर्षांची ओळख असल्यागत धागे जुळतात. सोप्या मराठीत सांगायचं तर 'वेव्हलेंग्थ' जुळते. त्या दोघांची वेव्हलेंग्थ अशीच जुळली. दोघांपैकी जो मोठा होता त्याला तीन मुली होत्या. त्यापैकी थोरल्या दोघींची लग्न होऊन त्यांना पोरंही झाली होती. तिसरं शेंडेफळ जरा लाडोबा होतं. तिचंही लग्नाचं वय झालं होतं. बापानं आजवर जवळजवळ पंचवीस स्थळं आणली होती. पण हिला एक काही पसंत पडत नव्हतं. कोणी चम्याच आहे, तर कोणी राक्षस आहे. कोणाची आईच माकडीणीसारखी दिसतेय, तर कोणाचा बापच जाडभिंग्या आहे, असली कारणं सांगून नकारघंटा ठाणठाण वाजत होती. पण आपल्या ह्या अप्सरेगत शेंडेफळासाठी तो चपला झिजवत होता. अचानक एकेदिवशी शेंडेफळानंच त्याचा प्रॉब्लेम सोडवला. ऑफिसमधून येताना एकाला घेऊन आली व ह्याच्याशी मी लग्न करतेय म्हणून ओळख करून दिली. एकूण बरा वाटलं तो त्याला. पण शेवटी बापाचं काळीज होतं ते, काळजी तर वाटलीच. काळजी वाटणंही स्वाभाविक होतं. खूप कष्टातून तो पुढं आला होता. पाच बहिणींचा एकटा भाऊ होता तो.

तीन अ. ल. क. (अति लघु कथा)

अलक १. रोज संध्याकाळी घरी आल्याआल्या त्याला काहीतरी सटरफटर खायला लागतं. एरवी ती काहीतरी तयार ठेवतेच. पण आज तिचा उपास असल्यामुळे जाम कंटाळा आला होता. 'तूच येताना काहीतरी आण' असं सांगायला दोनदा फोन केला, पण 'व्यस्त' लागला. काहीतरी करायलाच पाहिजे याविचाराने ती किचनकडे वळली. तेव्हढयात बेल वाजली. तिनं दार उघडलं. आत येऊन त्यानं एक पुडकं तिच्या हातात ठेवलं व म्हणाला, आज तुझा उपास आहे ना म्हणून साबुदाणा वडे आणलेत.... डोळ्यात दाटलेल्या धुक्यात ते पुडकं कधीच दिसेनासं झालं होतं.... अलक २. रिपरिप पावसातच ती घराजवळच्या मंडईत गेली होती. भाजी तर मनासारखी मिळाली, पण तसल्या त्या चिकचिकटात जड पिशव्या उचलायचं आता जिवावर आलं होतं. तेव्हढ्यात मागून एका कोवळ्या पण दणकट हातानं त्या पिशव्या उचलल्या. "क्लासमधून आलो तर बाबा म्हणले तू मंडईत गेली आहेस, म्हणून आलो पटकन... ", तो म्हणाला... तिच्याच काळजाचा तो तुकडा आता तिच्या डोळ्यात मावत नव्हता.... अलक ३. शाळेत असल्यापासून मी खूप आळशी आहे. विशेषतः दीर्घोत्तरी प्रश्नांना दीर्घ उत्तर अथवा पंधरा मार्कांसाठी निबंध वगैरे लिहायचं