मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चहा माझा सखा

कळायला लागल्यापासूनचं आठवत गेलो, तर सुरूवातीची एक पाच-सात वर्षं सोडल्यास गेली सुमारे पंचेचाळीस वर्षं मी चहा पितोय. सुरूवातीची वर्षं मात्र अति तापदायक होती. खरं म्हणजे चहा हवा असायचा, पण एक तर 'चहा मिळणार नाही, रात्री झोपायचा नाहीस' हे तरी ऐकायला लागायचं किंवा 'चहा पिऊ नको हो, काळा होशील' हे तरी. ह्या दोन्ही सबबी खरं तर अत्यंत टुकार आणि खोट्या आहेत. पण सांगणार कुणाला? डोक्याला डोकं आपटलं की शिंगं उगवतात, पेरूची बी गिळली की पोटातून झाड येतं, बेडकीला दगड मारला की मुकी बायको मिळते....  काय अन काय.  ते वयच ह्या आणि असल्या भाकड कथांवर विश्वास ठेवण्याचं होतं. चहासंबंधी सबबी त्यातल्याच. हळूहळू कुणा काकामामाच्या मेहेरबानीने अर्धी बशी चहा मिळू लागला. मग काही दिवसांनी आजोळी गेल्यानंतर आजी 'चाय कम, दूध ज्यादा' देऊ लागली. त्या पेयाला चहा म्हणणं चुकीचं होतं. पण निदान थोडा का होईना, चहा मिळतोय याचा आम्हाला आनंद, तर त्यानिमित्तानं पोरं दूध प्यायल्याचा आजीला आनंद. शेतावर जायला मात्र मी ज्याम खूष असायचो. इतर अनेक कारणं होती, पण शेतात गेल्यानंतर तिथली माणसं आमच्यासाठी चहा करायच

डोळा - एक वापरणे

गेले दोन दिवस, युवराजांनी महाराजांना दिलेली झप्पी व त्यानंतर केलेली जादुई नेत्रपल्लवी याची सर्वच माध्यमातून चर्चा होत आहे. काही प्रमाणात चेष्टा, टवाळी होतेय तर काही जण ही कृती कशी 'डिप्लोमॅटिक' आहे हे पटवून देत आहेत. काही जण इंग्लिश मराठी शब्द एकत्र जोडून युवराजांवर वार करत आहेत, तर काही जण व्यंगचित्रांद्वारे महाराजांवर शरसंधान करत आहेत. असो. आजच्या ह्या ब्लॉगचा विषय हा नाहीये. त्यानिमित्ताने  विचार करत असता विविध कारणांकरता होणारा डोळ्यांचा वापर  लक्षात येऊ लागला. इथे मुद्दा, डोळयांमधून सहजपणे व्यक्त होणारे भाव हा नसून डोळ्यांचा मुद्दाम होणारा वापर, असा आहे.  लहानपणची पहिली आठवण आहे ती प्राथमिक शाळेतल्या बाईंची. मुलं दंगा करू लागल्यावर त्यावर मोठा आवाज काढून त्या वर्गाला गप्प करत. मात्र त्यांच्या आवाजापेक्षा आम्हाला धाक होता तो त्यांच्या वटारलेल्या डोळ्यांचा. नंतर अनेकांना डोळे वटारताना मी पाहीले आहे. मात्र आमच्या त्या बाईंच्या डोळे वटारण्याची सर कुणालाही नाही. मे महिन्याच्या सुट्टीत डोळ्यांचा जेव्हढा वापर झाला तेव्हढा परत कधीही झाला नसेल. लॅडीस खेळताना आपल्या पार्टनर

आठवणींचा दरवळ

काल संध्याकाळी ऑफिस मधून घरी येताना रस्त्याच्या एका कोपऱ्यावर गाडीवाल्याने माझ्यासमोर वड्यांचा घाणा कढईत सोडला व त्या स्वर्गीय वासाने सारा आसमंत दरवळून गेला. हा वास माझ्या खूप लहानपणापासून परिचयाचा आहे. लहानपणी गावात रहात असताना आईबरोबर मंडईत गेल्यावर हा वास अवश्य येत असे. पण त्याकाळी बाहेरचे खाणे हे बऱ्यापैकी निषिध्द असल्यामुळे त्या वासाशी निगडीत असलेला स्वाद चाखायला मिळाला नव्हता.  बऱ्याच वर्षांनी कॉलेजमधे गेल्यानंतर त्या स्वादाशीही संबंध  आला.  इतका आला की नंतर नंतर नुसत्या वासावरून, सोडलेला घाणा हा भज्यांचा आहे का वड्यांचा, हेही ओळखता येऊ लागले. पण आजही तो वास आला की मला लहानपणी आईचे बोट धरून मंडईत गेल्याची आठवण येतेच. कुठल्या गोष्टीमुळे मन भूतकाळात खेचले जाईल त्याचा नेम नाही. एखादी वस्तू, व्यक्ती, गाणं, आवाज आणि अर्थातच वास. हे सगळे कधी ना कधीतरी घडलेल्या घटनांचे, प्रसंगांचे भागीदार, साक्षीदार असतात. आयुष्याच्या पुढल्या टप्प्यांवर अचानक भेटतात व आपल्याला पुन्हा मागे ओढून नेतात. मला काही वेळा तर असे वाटते की ज्ञानेश्वरांच्या सुद्धा अशा काही वासांशी जुळलेल्या आठवणी असणार. उगाच

भिकारी

तो आणि ती.... असतील तिशीचे.... दोघेही उच्चशिक्षित. मोठ्या, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कामाला. तरुण वयातच सर्व काही मिळवलेलं.... खरं तर फक्त पैसा मिळवलेला, बाकी खूप काही गमावलेलं, हरवलेलं.... आज अनेक दिवसांनी दोघेही एकत्र बाहेर पडले होते. याआधी कधी असे बाहेर गेलो होतो? दोघांनाही आठवत नव्हतं. सुरेखसे perfumes मारून दोघे निघाले होते. तिच्या हातात मागच्याच वर्षी पॅरीसला घेतलेली महागडी पर्स. आधी एखादा नवीन picture व नंतर एखाद्या रुफटॉप restaurant मध्ये जेवण, असा बेत ठरला होता.  हलक्या आवाजात किशोर व आशाची duets लावून तो मधूनच शीळ घालत होता. ती त्याच्याकडे बघत होती. दोघेही मूडमधे होते. एका सिग्नलला गाडी थांबली. काचेवर टकटक झाली म्हणून तिने बाहेर पाहीलं. एक साधारण आठ दहा वर्षांचं पोरगं गजरे हवेत का विचारत होतं. घेऊ का रे.... घे की. त्यात काय विचारायचंय.... ? कसे दिलेस रे? तिने काच खाली करून पोराला विचारलं. मॅडम, दहाला एक, वीसला तीन... घ्या ना तीन, ताजे आहेत... एव्हढे नकोत. पंधराला दोन दे. घ्या.  त्याने पटकन दोन गजरे काढून तिच्या हातात दिले. तिने पर्समधून वीसची नोट काढून

बिनडोक आंदोलने

व्यथित.... माझ्या आत्ताच्या मनःस्थितीला दुसरा शब्द नाही. आणि माझ्यासारखाच प्रत्येक सामान्य मनुष्य असाच व्यथित झालेला असणार आहे. अरे चाललंय काय? लाखो लिटर दूध सरळ ओतून देताय? दुधाला योग्य तो भाव मिळत नाहीये, हे कारण आम्हाला माहीत आहे आणि मान्य पण आहे. योग्य भाव मिळालाच पाहिजे यात वाद नाही. पण त्यासाठी पत्करलेला मार्ग सर्वस्वी अयोग्य व अन्यायकारक आहे. दूधच का? हल्ली प्रत्येक पीक रस्त्यावर टाकून नाश करायचा व आम्ही आंदोलन करतोय असे म्हणायचे, ही एक फॅशन झालीय. मागे टोमॅटो टाकले, त्याआधी कांदे झाले, कोथिंबीर झाली. आज वळून पाहिले तर नक्की कोणाचा फायदा झाला हे लगेच लक्षात येईल. शेतकऱ्याचा नक्कीच झालेला नाहीये. प्रत्येक वेळी स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाला तरी वेठीला धरायचे व काम संपल्यावर अलगद कल्टी मारायची. आंदोलन करणाऱ्यांपैकी नक्की किती जण स्वतः पोळलेले असतात हे पाहिले तर लक्षात येते की केवळ गुंडापुंडांच्या मदतीने अनेक शेतकऱ्यांचा व गवळ्यांचा माल हिसकावून घेऊन तो रस्त्यात टाकला गेलाय. कमी तर कमी, दोन पैसे मिळाले असते, ते ही गेले. आंदोलनामुळे साद्ध्य काय झाले? काही नाही. हजारो, लाखो ल

कॉर्पोरेट दिंडी - एक कटीपतंग

अगदी बालवर्गात असल्यापासून, मी पुण्यात येणारी दिंडी पहायला जातो आहे. पुढे शालेय जीवनात प्रत्यक्ष दिंडीतही भाग घेतला. माझ्या आठवणीतले वारकरी हे पूर्णपणे ग्रामीण भागातून आलेले, सर्वसाधारणपणे शेतकरी किंवा बलुतेदार वर्गातील असत. पुणेकर सामान्य नागरीकांचा सहभाग तसा मर्यादीतच होता. वारीचे स्वागत, वारकरी मंडळींची व्यवस्था यात कुठे कमतरता नसे, मुक्कामाच्या रात्री होणार्‍या भजन, कीर्तनाच्या कार्यक्रमात पुरेपूर सहभागही असे. पण आपण वारकरी नाही, आपला रोल काय आहे, हे माहीत असे. जो तो आपापला रोल नीट पार पाडत असे. मात्र गेली काही वर्षं, दिखाव्यासाठी म्हणून वारीत जाण्याची पद्धत आली आहे. त्याचं नवलंही वाटतं व खेदही होतो. नाही, वारीत जाण्याबद्दल objection नाहीये. खेद होतो तो वारीचा मूळ गाभा समजून न घेता, केवळ सेल्फी काढणं, त्या विविध सोशल मीडिया वर टाकणं, सासवड पर्यंत चालून आल्यावर, संध्याकाळी 'श्रमपरिहार' करणं, याचा. मी या अशा काही so called वारकऱ्यांची मुलाखत घेतली. हे सर्व जण कॉर्पोरेट क्षेत्रात विविध स्तरांवर काम करणारे नोकरदार अथवा उच्चशिक्षित व्यावसायिक होते. मिळालेली उत्तरे अत्यंत मजेश

पहिली वात

नमस्कार. माझ्या ह्या ब्लॉगचे नाव वाचून आश्चर्य वाटले का? साहजिक आहे कारण बर्‍याच लोकांना चमनचिडी हा प्रकार माहीत नसेल. हा दिवाळीत उडवण्याचा एक फटाका होता. एक पत्र्याची डबी, त्यात काळी दारू भरलेली, एक छोटीशी वात. पेटवल्या नंतर झुईई करत कुठल्याही रॅंडम दिशेला ही उडून जात असे. ही उडवल्या नंतर होणारी बघ्यांची पळापळ, हा एक वेगळा मनोरंजनाचा प्रकार घडत असे. काही छोटे अपघात पण होत. अखेर सरकारने यावर बंदी आणली. तर अशा या बंदी घातलेल्या पदार्थाचे नाव ब्लॉगला देण्यामागचा हेतू केवळ त्याच्या दिशाहीन उडण्याशी साम्य असण्यापुरता. ह्या ब्लॉग द्वारे मनात येणारे कुठलेही विचार तुमच्याशी शेअर करणार आहे. एखादा लेख, फोटो, प्रसंग, कविता, बातमी, काहीही, कधीही, कुठेही, काय जे वाटेल ते.... आता पटले ना, चमनचिडी नाव का ठेवले? जेंव्हा जमेल, जसे जमेल, तशी उडवत जाईन. मनोरंजन होईल, कदाचित काही विचार करायला प्रवृत्त करेल, पण अपघात नक्कीच होणार नाहीत. भेटूया मग असेच.....