मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तिची गाणी, त्याची गाणी - राज कपूर

हिंदी चित्रपटसृष्टीतील एक काळ देव , दिलीप आणि राज यांनी गाजवला. एकूणच सुवर्णयुग होते ते. गीत , संगीत , नृत्य , अभिनय , प्रत्येक बाबतीत. ह्या तिघांची , विशेषतः दिलीप आणि राज कपूर यांची गाणी , त्यातल्या अभिनयासाठी सुद्धा लक्षात राहीली आहेत , राहतील. या तिघांपैकी राज कपूर हा यशस्वी दिग्दर्शकही होता. (यातील यशस्वी हा शब्द महत्वाचा). मात्र स्वतःचे असोत किंवा दुसर्‍या दिग्दर्शकांचे असोत , राज कपूरनी अभिनयाच्या बाबतीत डावे उजवे कधीच केले नाही. अर्थातच आज त्याच्या गाण्यांविषयी बोलताना हे महत्वाचे ठरेल. कारण ' त्याच्या ' गाण्यांबद्दल बोलताना काही गाणी अशीही असणार आहेत , जी त्यानी गायलेलीच नाहीयेत. Confusing? बघूया... देव व दिलीप यांना राज कपूर सारखी परंपरा नव्हती. राजकपूरचे वडील पृथ्वीराज कपूर हे हिंदी नाटक क्षेत्रातील व नंतर हिंदी चित्रपटातील एक नामवंत कलाकार होते. जुन्या पिढीतील रसिकांना आजही त्यांचा ' सिकंदर ' आणि मुघले आझम मधला ' अकबर ' नक्की आठवतो. जरी वडिलांकडून वारसा मिळाला , तरी राजकपूरने स्वतःची विशिष्ट शैली विकसित केली. ह्या शैलीवर चार्ली चॅप्लिनच्या 

तिची गाणी, त्याची गाणी - वहीदा रहमान

वहीदा रहमान ही एक अतिशय सशक्त व समर्थ अभिनेत्री होती , आजही आहे.   यात कुठलेही दुमत असायचे कारण नाही . गाइड मधली रोझी असो , खामोषी मधली नर्स असो किंवा तीसरी कसम मधली हीराबाई असो , वहीदाने ह्या भूमिका अमर करून ठेवल्या आहेत . एक अतिशय ग्रेसफुल पण तितकीच मर्यादाशील अशी ही अभिनेत्री . कुठल्याही चित्रपटातील कुठलीही भूमिका घ्या . वहीदाने कधीही , कुठेही चीप वागल्याचे वा दिसल्याचे आठवणार नाही . तोच डौल , तोच संयमी अभिनय , तीच १०० % देण्याची वृत्ती . तीसरी कसम मधे ती हिराबाई दिसते , गाइड मधे रोझी वाटते , बीस साल बाद मधे गांव की छोरी म्हणून कुठेही कमी पडत नाही आणि देल्ही 6 मधे आजी म्हणून ही  शोभते . नो वंडर , तिच्या अनेक भूमिका गाजल्या . जो अभिनय संवाद बोलताना तोच अभिनय गाताना . आणि त्यामुळेच ' तिची गाणी ' आठवणे आपल्यासाठी मस्ट आहे . पहिल्या प्रथम आठवते ते सी आय डी मधले ' कहीं पे निगाहे , कहीं पे निशाना ' हे तिचे तिच्या पहिल्या हिंदी चित्रपटातील गाणे . त्याआध