मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मालिशवाले मामा

खूप लांबचा प्रवास करून आज घरी आलोय. अंग अगदी आंबून गेलंय. ताजंतवानं होण्यासाठी मसाज करून घ्यावा ह्या विचाराने जवळच्याच एका महागड्या स्पामधे निघालो आहे. मात्र मालिशवाल्या मामांची आठवण झाल्याशिवाय रहात नाहीये व त्यांच्या आठवणीनं डोळेही ओलावलेत..... माझी आणि मामांची ओळख तशी अचानकच झाली. अकरावी का बारावीत असताना एकदा खेळताना जोरात पडलो. त्या वयात तसं पडणं झडणं काही नवीन नव्हतं. पण ह्यावेळी जरा जोरातच पडलो. थोड्यावेळाने उठून पुन्हा खेळायला लागलो खरा, पण पाठच दुखायला लागली. घरी आलो व आईला सांगितलं. तिनं आपलं पाठीला तेल लाव, शेकून काढ, असले उपाय केले. पेनकिलरही दिली. पण पाठदुखी काही थांबेना. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांकडे निघालो होतो, तेव्हढ्यात आजोबांचे एक मित्र आले.  "डॉक्टरकडे रे कशाला चाललायंस? त्या मामाकडे जा आणि त्याला सांग काय ते. मस्त मालिश करून देईल की दहा मिनिटात उड्या मारत घरी येशील. जा, त्या मारुतीच्या पलीकडच्या वाड्यात रहातो तो. आणि माझं नाव सांग बरं का..."  थोडा विचार करून मीही डॉक्टरांकडे जाण्याऐवजी कोण त्या मामांकडे जायला निघालो. तिथे पोचलो तर एक म्हा

कट्ट्यावरले दिवस

स्थळ : बादशाहीचा बोळ , टिळक रोड , पेठ सदाशिव ( हे सांगायलाच पाहीजे का ?)... पुणे . वेळ : कुठलीही . काळ : साधारण पस्तीस वर्षांपूर्वीचा ... जेव्हा दहावीत पहिला येण्यासाठी ८० - ८५ टक्के मार्क्स पुरेसे असत ... जेव्हा कॉमर्सला जाण्यासाठी ६० टक्के पुरत ... जेव्हा पुण्यात मुख्यतः सायकली वापरल्या जात ... जेव्हा म्हातारी माणसे न भिता टिळक रोड क्रॉस करू शकत ... जेव्हा आमचे पोट आणि छाती एका रेषेत होती ... जेव्हा डोक्यावर भरपूर केस होते व ते काळे पण होते ... तो काळ .. हा कट्टा त्या जागीच का जमला ?   विशेष काही नाही . एक तर जागा अतिशय मोक्याची . बसायला एका गायन क्लासच्या पायऱ्या अथवा पुणेरी भक्कम नावाचे पण आकाराने बेताचे असे एक हॉटेल . आणि बोळातच पुढे एका मित्राचे घर . त्यामुळे बऱ्याच गोष्टींची सोय ... हा कट्टा ... सुरू झाला साधारण सनी देओल , अनिल कपूर , सिद्धू , मनोज प्रभाकर , वॉ बंधू , अम्ब्रोज , यांच्या उदयापासून ..... संपला साधारण ... नाही नाही ... नाही संपला ... आणि