काल माझ्या मुलानं हा चित्रपट पाहिला. त्याच्या मित्रांसोबत... सगळेच जण वीस एकवीस वर्षांचे. तारुण्य, उत्साह, जोश, सगळं काही यथास्थित... घरी आल्यापासून अजूनही हा चित्रपट त्याच्या डोक्यातून गेला नाहीये. एकेका प्रसंगावरच्या प्रतिक्रिया वयाला साजेशा... आताच त्याच्या आईला एक एक प्रसंग सांगत होता. ते तांदुळाच्या पिंपा... मी उठून गेलो. मला सहन होत नाही. चित्रपट बघणं तर अशक्य होईल मला. पण एक निश्चित... माझी लेखणी यापूर्वी कधीच अशी थिजली नव्हती... © मिलिंद लिमये
मन आणि च'मन'चिडी, कुठल्या दिशेला उडतील, ह्याचा नेम नाही. ह्या ब्लॉग द्वारे मनात येणारे कुठलेही विचार तुमच्याशी शेअर करणार आहे. एखादा लेख, फोटो, प्रसंग, कविता, बातमी, काहीही, कधीही, कुठेही, काय जे वाटेल ते.... आवडल्यास कृपया 'लाइक' करा व तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.