मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भिंतीवरील (उ)फराटे

फेसबुकवर अकाउंट उघडून तशी मला अनेक वर्षं झाली. फेबुवर नक्की कसल्या व कशासाठी पोष्टी टाकायच्या हेच मला कळत नव्हतं. त्यामुळे तो अकाउंट तसाच पडून होता. पण सुमारे एक वर्षांपूर्वीपासून पोष्टी टाकायला सुरुवात केली. झालं काय की आमच्या सोसायटीच्या हस्तलिखित मासिकात काही फुटकळ लिखाण करत होतो. सुमारे दोन वर्षात ते मासिक बंद पडलं. पण लिखाणाचा किडा चावला तो चावलाच. म्हणून मग हा ब्लॉग लिहायला लागलो. मग कुणीतरी सुचवलं की हे सगळं फेबुवर टाक. त्या गोष्टी फेबुवर टाकता टाकता इतर पोष्टीही टाकू लागलो. पोष्टी टाकल्यात म्हणताना लोक कॉमेंट्स टाकू लागले. अंगठे, स्मायल्या वगैरेतर पोत्यानं मिळू लागल्या. फेबुवर नक्की काय करतात हा प्रश्न आता मागे पडला.  मधल्या काळात वपुंचं 'प्लेझर बॉक्स' वाचनात आलं. वाचकांची आलेली पत्रं व त्यांच्या प्रतिक्रिया यांचं अतिशय सुंदर संकलन व विश्लेषण वपुंनी केलं आहे. त्याकाळी पोष्टानं पत्र येत. त्यामुळे त्या पत्रपेटीला 'प्लेझर बॉक्स' असं अत्यंत समर्पक नावही वपुंनी दिलं. तसं खूप पूर्वी ते वाचलं होतं. पण त्यावेळी मी 'बा वाचका'च्या पामर भूमिकेत होतो. मधल्या का

अस्पष्टाचा हुंकार

मनात एक द्वंद्व. प्रस्थापितांची मक्तेदारी पटवून घ्यायची का त्याविरुद्ध उभं ठाकून विस्थापित व्हायचं. सगळं काही असह्य होतंय. काहीतरी करायला हवं. कोणी एक पैशाच्या हव्यासापोटी आले. कोणी व्यापारासाठी आले आणि राज्यकर्ते झाले. कोण हे टिकोजीराव? यांना हाकलायलाच पाहिजे. काहीतरी करायला हवं. सगळं व्यवस्थित चाललं होतं. अचानक कोणीतरी कोणालातरी मारलं. का मारलं माहीत नाही. पण घरदार माझं जळालं. त्याला मारलं म्हणून माझं घरदार का जाळलं? माहीत नाही. काहीतरी करायला हवं. दैवयोगे कुठेतरी उकिरड्यावर जन्माला आलो. आजूबाजूच्या खातेऱ्यातून बाहेरतर पडायचंय, पण काही मूठभर परत तिथेच ढकलताहेत. काहीतरी करायला हवं. नकाशावर दाखवताही येणार नाही अशा एका जगात ते रहातात. साधा ताप आला तरी देवऋषाकडे जाऊन  जादूटोणा करतात. साध्या साध्या आजारात किडामुंगीसारखे मरतात. काहीतरी करायला हवं. प्रतिस्पर्धी फॉर्मात आहे. जिंकायच्या ईर्ष्येने पेटला आहे. बाकीचे सहकारी खचतात की काय असं वाटतंय. काहीतरी करायला हवं. काहीतरी करायला हवं. काहीतरी करायला हवं. काहीतरी करायला हवं.... हा असतो अस्पष्टाचा हुंकार... अंतरीच्या या हुंका