मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नंदी

पहायला गेलं तर तो होता एक अनामिक. पण खरं सांगायचं तर त्याला अनेक नावं होती. गावातले लोक त्याला कुठल्याही नावानं हाक मारत, पण त्याचं खरं नाव कुणालाच माहीत नव्हतं. कुणाला कशाला, खुद्द त्याला स्वतःलाही त्याचं स्वतःचं नाव माहीत नव्हतं. त्यातल्या त्यात शंकराच्या देवळातल्या गुरवीणबाईंनी ठेवलेलं 'नंदी' हे नाव पॉप्युलर होतं. नंदी इतका दुर्दैवी मी अद्याप कुठे पाहिला नाहीये. तो डोक्यानं थोडासा कमी होता. म्हणजे आजकालच्या भाषेत सांगायचं तर तो थोडासा 'गतिमंद' होता. गावातल्या जुन्या लोकांना नक्की आठवत होतं की तो धनगरांच्या एका तांड्याबरोबर गावात आला. असेल तेव्हा तीन चार वर्षांचा. तांड्यातल्या मेंढ्यांमागे रानात फिरायचा. किंवा मग बापाचं बोट धरून बाप जाईल तिथं जायचा. सगळ्या गावाला ही बापलेकाची जोडी माहीत पडली होती. त्याची एक विचित्र सवय होती. मेंढ्यांमागे फिरता फिरता हा पोरगा कुठेही झोपून जायचा. त्या बापाला रोज संध्याकाळी ह्याला येड्याला शोधून आणायचं एक कामंच लागलं होतं. एक दिवस तो तांडा निघून गेला. पण कसा कुणास ठाऊक, हा मागंच राहिला. निघायच्या गडबडीत आईबाप ह्याला विसरले का कुठेतर

गिरणीवाली

"कशापाई येवडी राबतीया तू? ज्यानं चोच दिलीयं त्यो चारा बी दील..." कोणी एक मावशी गिरणीवाल्या बाईला दोन शब्द सुनावत होती. "अवं कमळीच्या आजी, चारा त्यानं दिला तरी तिथवर जायाला पंख तर पाखरालाच मारावे लागतात की..." गावातल्या आमच्या घराजवळच्या एका गिरणी कम दुकानातला हा संवाद गेली किमान चाळीस वर्षं माझ्या लक्षात असेल. कमळीच्या आजीला अशा तऱ्हेने उलटं सुनवायचा गिरणीवालीला पूर्ण हक्क होता. सारा आसमंत तिला गिरणीवाली बाई असंच म्हणायचा, कारण तिचा नवरा गिरणीवाला होता. माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्या आळीच्या कोपऱ्यावर, एका मोठ्या गाळ्यात त्यांची पिठाची गिरणी होती. गाळ्याच्या एका भागात नवऱ्याची गिरणी व दुसऱ्या भागात गिरणीवाल्या बाईचं गोळ्या, बिस्किटं, पेन्सिली, वह्या, सिगरेटी, तंबाकू असं काहीबाही विकायचं फुटकळ दुकान होतं. गिरणीजवळच्याच एका वाड्यात त्यांचं बिऱ्हाड होतं. गिरणीवाला रोज सकाळी लवकर गिरणी उघडायचा ते पार रात्रीपर्यंत. गिरणीवाली बाई संसार सांभाळून जमेल तसं तिचं दुकान चालवायची. गुरुवारी गिरणीला सुट्टी असायची. त्या दिवशी दोघही जण जात्याच्या पाळ्यांना टाकी लावत बसलेले

पेटीवाला

पुणे शहरातील एका अत्यंत स्ट्रॅटेजिक अशा नाक्यावर वर्षानुवर्षं आमचा कट्टा होता. अत्यंत प्रसिद्ध अशा पेठेतल्या एका महत्वाच्या रस्त्याला तिरपी टांग मारून एक पुणेरी बोळ जात असे. बरोब्बर त्याच स्ट्रॅटेजिक पॉइंटला एका बाजूला खास पुणेरी हॉटेल, जिथे अतिशय छान कॉफी मिळत असे, तर दुसऱ्या बाजूला अत्यंत चविष्ट असा कांदा उत्तप्पा खिलवणारे उडप्याचे हॉटेल होते. पलीकडेच एक गायन क्लास होता. त्याच्या पायऱ्या हा आमचा कट्टा. इतर कुठल्याही कट्ट्याप्रमाणे वाच्य व अर्वाच्य गप्पा हा आमच्याही कट्ट्याचा मुख्य उद्योग असला तरी जुनी हिंदी गाणी, अभिनेते व अभिनेत्री, क्रिकेट व क्रिकेटपटू हेही विषय आम्हाला वर्ज्य नव्हते. विशेषतः जुनी हिंदी गाणी जर सुरू झाली तर आम्हाला भंकस करायलाही आठवण राहायची नाही. या सगळ्याव्यतिरिक्त रस्त्यावरून येणारी जाणारी लोकं हा ही एक मनोरंजनाचा व निरीक्षणाचा सांस्कृतिक कार्यक्रम असायचा. क्वचित एखादेवेळी कट्ट्यावर एकटा जरी कोणी असेल तरी इतरजण येईपर्यंत नुसती लोकं बघण्यातही खूप वेळ जात असे. हातगाडीवाले, फेरीवाले, रिक्षावाले, सायकलवाले, नुकतीच लग्न झालेली जोडपी, म्हातारी जोडपी, आईच्या हात