मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अन्नदान

कितीतरी वेळ ती उन्हातान्हात उभी होती, उपाशी तान्हुल्याला छातीशी धरून.... त्या मोठ्या वाड्याच्या मागल्या दाराशी उभं राहून आत चालू असलेल्या जेवणावळी तिला दिसत होत्या... आतापर्यंत निदान दहावेळा तरी येणाऱ्याजाणाऱ्या नोकरांच्या हातापाया पडली होती, एका कोरभर पोळीच्या तुकड्यासाठी... मिळाली होती फक्त उपेक्षा आणि अवहेलना... आतमध्ये अनेक लोक जेवत होते, पक्वान्नांवर ताव मारत होते, यजमानाला अन्नदानाचे पुण्य चिंतित होते... पंगत उठली, नोकरांनी उष्ट्या, खरकट्या, तडस लागल्यामुळे सुग्रास पदार्थ तसेच टाकलेल्या, ताटंवाट्या उचलल्या.... "जा रे, ते सगळं उकिरड्यावर टाकून या. कुत्र्यांना अन्नदान केल्याचं पुण्य आपण मिळवू", कुत्सित हसत मुख्य नोकर ओरडला... ३०-४० कुत्र्यांचा जमाव, भुंकत, दात विचकत, चावे घेत त्या अन्नावर तुटून पडला... ती मात्र तिथेच उभी होती, उन्हातान्हात, उपाशी तान्हुल्याला छातीशी धरून.... पोळीच्या कोरभर तुकड्यासाठी.... 

तिची गाणी, त्याची गाणी - ऋषी कपूर

ऋषी कपूर म्हणल्याक्शणी आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो एक चॉकलेट हीरो. गुलजार , देखणा , हॅण्डसम , टिपिकल कपूर. रोमॅंटिक भूमिका , नाच , गाणी या पलीकडे आपण त्याला आठवू शकत नाही. पण ऋषी एक अत्यंत समर्थ अभिनेता होता. चित्रपटसृष्टी केवळ त्याच्या रोमॅंटिक इमेजचा फायदा घेत राहिली. तो तिथला भाग आहे. मात्र आपण त्याच्या गाण्यांबद्दल व अभिनयाबद्दल न बोलणे हा त्याच्यावर अन्याय होईल. वडील राज कपूर यांच्या प्रमाणेच ऋषीला सूर व शब्द यांची अचूक जाण होती. अजून एक गोष्ट त्याने त्यांच्याकडून घेतली होती , ती म्हणजे , अतिशय बोलका व क्षणात भाव बदलणारा चेहरा. आणि ह्याच दोन गोष्टींसाठी ' त्याची गाणी ' सदरासाठी तो पात्र ठरतो. सत्तर व ऐंशीच्या दशकांमधली त्याची अनेक गाणी आपण आजही ऐकतो , गुणगुणतो. पण आज काही गाणी अशी आठवूया की जी एरवी आपण म्हणतोच असे नाही. जीतेंद्र व रीना रॉय यांच्याबरोबर त्याचा ' बदलते रिश्‍ते ' नावाचा एक , तसा कमी प्रसिद्ध , चित्रपट आहे. ऋषीचे व रीनाचे कॉलेज मधे प्रेम असते. पण नंतर तिचे लग्न जीतेंद्र बरोबर होते. ती त्याला विसरलेली नसते. त्यामुळे काही काळानंतर योगायोगाने तो परत...

दिवाळीचे दिवस

लेखाचा विषय वाचल्या वाचल्या अनेकांच्या मनात पहिला विचार आला असणार की , ' हं , घ्या अजून एक ' गेले ते दिवस ' छाप गळा काढणारा लेख '. तसे जर कोणाला वाटले असेल तर खरोखर मला आश्चर्य वाटणार नाही . ह्या पद्धतीचे अनेक लेख दर दिवाळीत आपल्यासमोर येत असतात . म्हणून मग ठरवले की माझ्या व्यवसायानिमित्त कळलेले विषय , आलेले अनुभव ह्या अनुषंगाने दिवाळीकडे पहावे . ऐन दिवाळीत बाहेर देशात जावे लागल्यामुळे तिथे पाहिलेल्या दिवाळीबद्दल लिहावे . अनेक जण अनेक वेळा मला विचारतात की आपल्या देशात हे एप्रिल ते मार्च असे आर्थिक वर्ष ठेवण्याचा आचरटपणा का करतात ? सरळ कॅलेंडर इयर का नाही करून टाकत ? नवीन युगात तसे करायला काहीही हरकत नाहीये . पण एक लक्षात घेऊ की यात आचरटपणा मात्र अजिबात नाहीये . आपला देश हा एक शेतीप्रधान देश आहे . आज इतकी औद्योगिक प्रगती करूनसुद्धा देशातील बहुसंख्य जनता शेतीवरच अवलंबून आहे . नीट विचार केलात तर एक लक्षात येईल की एप्रिल ते मार्च हे आर्थिक ...