सुमारे बावन्न वर्षांपूर्वी तो एका सकाळी कॉलेजमधे लेक्चर घेत होता. नोकरी करता करता सीएस व आयसीडब्लूए पण करत होता. डोळ्यात स्वप्नं होती, खांद्यावर जबाबदारी होती. वर्ग चालू असतानाच शिपाई आत आला व त्यानं त्याला फोन आल्याचे सांगितले. तो त्याच फोनची वाट बघत होता. पलीकडून त्याला अपेक्षित बातमी मिळाली. त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. कसंबसं लेक्चर संपवून त्यानं सासुरवाडीची वाट धरली. काही तासापूर्वी जन्माला आलेल्या त्या बाळाला त्यानं हातात घेतलं. त्या गोड गाठोड्यानं त्याच्या खांद्यावर पडलेल्या आणखी एका जबाबदारीची जाणीव त्याला करून दिली. पण त्याची त्याला फिकीर नव्हती. व्यावसायिक परीक्षा पास होऊन तो कॉर्पोरेट क्षेत्रात घुसला. तिथे प्रगती करता करता त्याच्या खांद्यावरच्या जबाबदाऱ्या दर दिवशी वाढत गेल्या. घरच्या आघाडीवरही म्हातारे आईवडील, बायको व दोन मुलं अशी जबाबदारी त्याच्या खांद्यावर होतीच. ह्या सगळ्या गडबडीत तो आमच्यापासून थोडा लांब गेला. आम्हा भावंडांचं भावविश्व हे आई आणि आजीआजोबांभोवतीच फिरत राहिलं. त्याच्या खांद्यावर बसून फिरणं किंवा थोडं मोठेपणी त्याच्या...
मन आणि च'मन'चिडी, कुठल्या दिशेला उडतील, ह्याचा नेम नाही. ह्या ब्लॉग द्वारे मनात येणारे कुठलेही विचार तुमच्याशी शेअर करणार आहे. एखादा लेख, फोटो, प्रसंग, कविता, बातमी, काहीही, कधीही, कुठेही, काय जे वाटेल ते.... आवडल्यास कृपया 'लाइक' करा व तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.