मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2026 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दानशूर

सुट्टीच्या दिवशीची, सकाळची बाजारफेरी हा माझा आवडता सांस्कृतिक कार्यक्रम आहे. काहीतरी किडूकमिडूक खरेदीच्या निमित्ताने बाजारात फिरणे व त्यानिमित्ताने लोकांचे विविध नमुने पहाणे हा माझा आवडीचा छंद आहे. गप्पा मारणाऱ्या लोकांचे हावभाव, त्यांचे, माझ्यासाठी संदर्भहीन असणारे संवाद, आईबाबांबरोबर जाणारी, स्वतःतच गुंग असणारी लहान मुलं, मन लावून भाजीचे सुंदर ढीग लावणारे भाजीवाले, पन्नास पंचावन्न वर्षं संसार केलेले, एकमेकांना आधार देत निघालेले आजीआजोबा, पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचं अंतर वगळता इतर कुठलंही अंतर 'जवळचं' मानून यायला नकार देणारे रिक्षावाले, ही आणि अशी अनेक माणसं बघायला मला खूप आवडतं. आजही अशीच एक फेरी मारून, बायकोनं सांगितलेल्या काही वस्तू घेऊन मी घरी निघालो होतो. एका बखळवजा मोकळ्या जागेत काहीतरी सभा भरली होती. एक छोटंसं स्टेज, त्यावर दोन तीन खुर्च्यांवर कुणी बसले होते. समोर सतरंजीवर पाच दहा पोरं आणि तितकीच मोठी माणसं बसली होती. आणखी दहा बारा बाजूनं उभी होती. कुणा अब्जाधीशानं, कशासाठी तरी काही हजार रुपये दान दिल्याबद्दल 'थोर दानशूर' म्हणून त्याचा सत्कार होता. समाजाचं देणं, ...

हरवले ते गवसेल का?

 गेले काही दिवस एक सद्गृहस्थ आपल्या दोन नातवंडांना घेऊन टेकडीवर फिरताना दिसत होते. तसे अनेकजण, विशेषतः सुट्ट्यांच्या दिवसात नातवंडांना घेऊन फिरायला येतात. पण हे प्रकरण जरा वेगळंच वाटत होतं. हे गृहस्थ नुसतं फिरत नसत. आसपास माझ्याच वयाचे वाटत होते. नातवंडांच्या बरोबरीनं कधी शिवाशिवी खेळ, कधी झाडाच्या मागे लप, कधी कुठल्याशा पानाची पिपाणी करून वाजव, असे उद्योग करत. एकदा पतंग घेऊन आले आणि ऊन तापेपर्यंत उडवत बसले. एकदा तर जुना टायर आणून त्याची चकारी खेळले. मुलांना विषामृत, रुमालपणी वगैरे शिकवत होते. हे जरा वेगळं वाटतंय नाही का असा विचार मी हिला बोलूनही दाखवला. मी त्यांच्या ह्या उद्योगावर लक्ष ठेवून आहे हे त्यांच्या लक्षात आलं असावं. आजच सकाळी मला गाठलं. काय हो, काय छान आहे तुमचा कुत्रा. इतका स्वच्छ कुत्रा मी फार कमी वेळा पाहिलाय. हो हो, बरोबर आहे तुमचं. आमची ही खूप छान निगा राखते त्याची. सगळं श्रेय तिचं... बोलता बोलता हळूच त्यांनी विषय काढला. काय हो, तुम्हाला गोट्या खेळता येतात का? मी थक्क झालो.  हो येतात, पण जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षं झाली असतील खेळलो नाहीये... मलाही साधारण तितकी...

मागचं सीट

मागल्या आठवड्यात काही कामानिमित्त शहराजवळच्या ग्रामीण भागात जाणं झालं. पावसाळा सरत आला होता तरी अधूनमधून  रिमझिम चालू होती. आधी झालेल्या पावसामुळे निसर्गाने हिरव्या रंगाची उधळण केली होती. हिरव्या रंगाच्या अनेक छटा, मधूनच वाहणारे झरे, लांब डोंगरात दिसणारे छोटे छोटे धबधबे, शेतात चरणारी गुरं मनाला सुखावून जात होते. मी गाडीत मागच्या सीटवर बसून ह्या सगळ्याचा आनंद घेत होतो. काही अंतर गेल्यावर मला एक तरुण मुलगा एका म्हाताऱ्याला, बहुधा त्याचा आजा असावा, सायकलच्या मागच्या कॅरियरवर बसवून सायकल हाणत चालला होता. रस्ता तसा अरुंद होता. त्यामुळे चालकाने सावकाश त्यांच्या शेजारून गाडी पुढे काढली. त्यांच्या शेजारून जाताना माझी म्हाताऱ्याशी नजरभेट झाली. त्यानं हसून मला रामराम केला. मीही त्याला प्रतिनमस्कार केला. आम्ही पुढे निघालो. हे मागचं सीट फार लहानपणापासून माझ्या आठवणीत आहे. माझ्या लहानपणी सर्व मंडळी सर्रास सायकली वापरायची. त्यामुळे कळायला लागल्यापासून आईच्या लेडीज सायकलच्या मागल्या कॅरियरवर बसून मी तिच्याबरोबर जात असे. बाबांनी मात्र पुढल्या दांड्यावर एक छोटं सीट खास माझ्यासाठी बसवून घेतलं होतं. ...

उपक्रमांचा विजय असो

 मी रोज घराजवळच्या एका टेकडीवर फिरायला जातो. ही टेकडी तशी प्रसिद्ध आहे. अनेक संस्था सुट्टीच्या दिवशी विविध उपक्रम राबवण्याकरता या टेकडीला निवडतात. आजही एका जुन्या, नामवंत 'क्लब'ने पर्यावरण जपण्याच्या हेतूने प्लास्टिक वापराबद्दल काही उपक्रम आयोजिला होता. क्लब नामवंत, त्यामुळे अर्थातच त्याचे मेम्बर्सही नामवंत, एलिट वर्गातले. बरीच गर्दी होती. बहुतेक मेंबर मराठी होते. कारण इंग्लिशमधे बोलत होते. 'व्हॉट अ डेंजरस धिस प्लास्टिक, यू नो' वगैरे कॉमेंट्स कानावर पडत होत्या. मेम्बरांच्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केलेली दिसत होती. सगळा तामझाम होता.  मला पोचायला थोडा उशीर झाल्यामुळे माझा रोजचा ग्रूप पुढे निघून गेला होता. ही सगळी गर्दी कापत त्यांना गाठण्यापेक्षा वेगळ्या शांत बाजूला जावं असा मी विचार केला. कधी कधी अशी शांततासुद्धा गरजेची असते. त्या शांततेलाही एक आवाज असतो. पक्षी चिवचिवत असतात. झाडं सळसळत असतात. साधं वाळलेलं पानही झाडावरून पडताना एक हलकासा आवाज करत काही सांगून जातं. आज या सगळ्याचा आनंद घेत मी चालत चाललो होतो. आमच्या ह्या टेकडीवरच्या पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून वन...