परवा ३१ तारखेला तिथीनं माझ्या आयुष्यात घडलेल्या या सत्यघटनेला चौतीस वर्षं पूर्ण झाली... १९८८ सालच्या पाडव्याच्या आदल्या रात्रीची ही गोष्ट आहे. सहा आठ महिन्यापूर्वीच मी सीएची आर्टिकलशिप सुरू केली होती. कामानिमित्त बरेचवेळा बाहेरगावी जावं लागायचं. पण दुसऱ्या दिवशी पाडव्याची सुट्टी असल्यामुळे मी घरीच होतो. त्याकाळी केबल टीव्ही वगैरे काहीही नसल्यामुळे व दूरदर्शन मर्यादित वेळेतच चालत असल्यामुळे रेडिओ, त्यातही विविध भारती आणि रेडिओ श्रीलंका हे मनोरंजनाचे मुख्य साधन होते. रोज रात्री साडेअकरापर्यंत 'बेला के फूल' ऐकणे हा एक थ्रिलिंग प्रकार असायचा. बेला के फूल ऐकणारा हा सर्वसाधारणपणे दर्दी मानला जायचा. मी मात्र कुणी दर्दी मानावं यासाठी नाही तर खरोखर जुन्या गाण्यांच्या प्रेमापायी बेला के फूल पर्यंतचे सर्व कार्यक्रम ऐकत असे. त्यादिवशी दुसऱ्या दिवशीच्या पाडव्याची तयारी करायला आईला मदत करून माझ्या खोलीत गेलो. एका बाजूला विविध भारती चालू होतं व दुसऱ्या बाजूला काहीतरी वाचत पडलो होतो. बेला के फूलचं शेवटचं गाणं लागायच्या बेतात होतं. रेडिओवर अनाउन्समेंट चालू होती, आईए सुनतें है ...
मन आणि च'मन'चिडी, कुठल्या दिशेला उडतील, ह्याचा नेम नाही. ह्या ब्लॉग द्वारे मनात येणारे कुठलेही विचार तुमच्याशी शेअर करणार आहे. एखादा लेख, फोटो, प्रसंग, कविता, बातमी, काहीही, कधीही, कुठेही, काय जे वाटेल ते.... आवडल्यास कृपया 'लाइक' करा व तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.