मागल्या आठवड्यात काही कामानिमित्त शहराजवळच्या ग्रामीण भागात जाणं झालं. पावसाळा सरत आला होता तरी अधूनमधून रिमझिम चालू होती. आधी झालेल्या पावसामुळे निसर्गाने हिरव्या रंगाची उधळण केली होती. हिरव्या रंगाच्या अनेक छटा, मधूनच वाहणारे झरे, लांब डोंगरात दिसणारे छोटे छोटे धबधबे, शेतात चरणारी गुरं मनाला सुखावून जात होते. मी गाडीत मागच्या सीटवर बसून ह्या सगळ्याचा आनंद घेत होतो. काही अंतर गेल्यावर मला एक तरुण मुलगा एका म्हाताऱ्याला, बहुधा त्याचा आजा असावा, सायकलच्या मागच्या कॅरियरवर बसवून सायकल हाणत चालला होता. रस्ता तसा अरुंद होता. त्यामुळे चालकाने सावकाश त्यांच्या शेजारून गाडी पुढे काढली. त्यांच्या शेजारून जाताना माझी म्हाताऱ्याशी नजरभेट झाली. त्यानं हसून मला रामराम केला. मीही त्याला प्रतिनमस्कार केला. आम्ही पुढे निघालो. हे मागचं सीट फार लहानपणापासून माझ्या आठवणीत आहे. माझ्या लहानपणी सर्व मंडळी सर्रास सायकली वापरायची. त्यामुळे कळायला लागल्यापासून आईच्या लेडीज सायकलच्या मागल्या कॅरियरवर बसून मी तिच्याबरोबर जात असे. बाबांनी मात्र पुढल्या दांड्यावर एक छोटं सीट खास माझ्यासाठी बसवून घेतलं होतं. ...
मन आणि च'मन'चिडी, कुठल्या दिशेला उडतील, ह्याचा नेम नाही. ह्या ब्लॉग द्वारे मनात येणारे कुठलेही विचार तुमच्याशी शेअर करणार आहे. एखादा लेख, फोटो, प्रसंग, कविता, बातमी, काहीही, कधीही, कुठेही, काय जे वाटेल ते.... आवडल्यास कृपया 'लाइक' करा व तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.