वहीदा रहमान ही एक अतिशय सशक्त व समर्थ अभिनेत्री होती , आजही आहे. यात कुठलेही दुमत असायचे कारण नाही . गाइड मधली रोझी असो , खामोषी मधली नर्स असो किंवा तीसरी कसम मधली हीराबाई असो , वहीदाने ह्या भूमिका अमर करून ठेवल्या आहेत . एक अतिशय ग्रेसफुल पण तितकीच मर्यादाशील अशी ही अभिनेत्री . कुठल्याही चित्रपटातील कुठलीही भूमिका घ्या . वहीदाने कधीही , कुठेही चीप वागल्याचे वा दिसल्याचे आठवणार नाही . तोच डौल , तोच संयमी अभिनय , तीच १०० % देण्याची वृत्ती . तीसरी कसम मधे ती हिराबाई दिसते , गाइड मधे रोझी वाटते , बीस साल बाद मधे गांव की छोरी म्हणून कुठेही कमी पडत नाही आणि देल्ही 6 मधे आजी म्हणून ही शोभते . नो वंडर , तिच्या अनेक भूमिका गाजल्या . जो अभिनय संवाद बोलताना तोच अभिनय गाताना . आणि त्यामुळेच ' तिची गाणी ' आठवणे आपल्यासाठी मस्ट आहे . पहिल्या प्रथम आठवते ते सी आय डी मधले ' कहीं पे निगाहे , कहीं पे निशाना ' हे तिचे तिच्या पहिल्या हिंदी चित्रपटातील गाणे . त्याआध...
मन आणि च'मन'चिडी, कुठल्या दिशेला उडतील, ह्याचा नेम नाही. ह्या ब्लॉग द्वारे मनात येणारे कुठलेही विचार तुमच्याशी शेअर करणार आहे. एखादा लेख, फोटो, प्रसंग, कविता, बातमी, काहीही, कधीही, कुठेही, काय जे वाटेल ते.... आवडल्यास कृपया 'लाइक' करा व तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.