मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

#Society लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अन्नदान

कितीतरी वेळ ती उन्हातान्हात उभी होती, उपाशी तान्हुल्याला छातीशी धरून.... त्या मोठ्या वाड्याच्या मागल्या दाराशी उभं राहून आत चालू असलेल्या जेवणावळी तिला दिसत होत्या... आतापर्यंत निदान दहावेळा तरी येणाऱ्याजाणाऱ्या नोकरांच्या हातापाया पडली होती, एका कोरभर पोळीच्या तुकड्यासाठी... मिळाली होती फक्त उपेक्षा आणि अवहेलना... आतमध्ये अनेक लोक जेवत होते, पक्वान्नांवर ताव मारत होते, यजमानाला अन्नदानाचे पुण्य चिंतित होते... पंगत उठली, नोकरांनी उष्ट्या, खरकट्या, तडस लागल्यामुळे सुग्रास पदार्थ तसेच टाकलेल्या, ताटंवाट्या उचलल्या.... "जा रे, ते सगळं उकिरड्यावर टाकून या. कुत्र्यांना अन्नदान केल्याचं पुण्य आपण मिळवू", कुत्सित हसत मुख्य नोकर ओरडला... ३०-४० कुत्र्यांचा जमाव, भुंकत, दात विचकत, चावे घेत त्या अन्नावर तुटून पडला... ती मात्र तिथेच उभी होती, उन्हातान्हात, उपाशी तान्हुल्याला छातीशी धरून.... पोळीच्या कोरभर तुकड्यासाठी.... 

दोघी...

ही पहिली... उच्चशिक्षित. शाळेत असल्यापासूनच खूप हुषार. आता आयटी क्षेत्रातल्या नावाजलेल्या कंपनीमधे नोकरी. भलामोठा पगार.  नवराही अगदी शोभेलसा. शहराच्या उत्तम भागात सुरेखसे घर. दोघांच्याही आपापल्या चारचाकी, दुचाकी गाड्या. घरात काहीही कमी नाही. आज बऱ्याच दिवसांनी छोट्याला घेऊन आईकडे आली होती. आईला एकाच वेळी आश्चर्यही वाटलं होतं, आनंदही झाला होता, पण तिचा चेहरा पाहून जरा शंकेची पालही चुकचुकली होती. चहापाणी झाल्यावर हळूच आईनं विषय काढला आणि तिचा बांध फुटला. "........ लक्ष देत नाही...... रोज उशिरा येतो..... तोही खूप दारू पिऊन....विचारलं तर धड बोलत नाही....कधीमधी हात टाकतो.... बहुतेक बाहेर कुणी एक मैत्रीण असावी.....असं वाटतं की सरळ बॅग उचलावी व तुझ्याकडे निघून यावं....." आईनं नीट ऐकून घेतलं व एकेक पत्ता टाकत समजवायला सुरुवात केली. "......तुझ्या बाबांची इभ्रत........भावाचं स्थान......आम्ही केलेले संस्कार......लोक काय म्हणतील......छोट्याकडे बघून तरी विचार कर......तू सुद्धा काही कमी हट्टी नाहीयेस.....एकट्या बाईचं जगणं........." जन्मदात्या आईच्या कुशीतसुद्धा जागा ...