मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

#wink लेबलसह पोस्ट दाखवत आहे

डोळा - एक वापरणे

गेले दोन दिवस, युवराजांनी महाराजांना दिलेली झप्पी व त्यानंतर केलेली जादुई नेत्रपल्लवी याची सर्वच माध्यमातून चर्चा होत आहे. काही प्रमाणात चेष्टा, टवाळी होतेय तर काही जण ही कृती कशी 'डिप्लोमॅटिक' आहे हे पटवून देत आहेत. काही जण इंग्लिश मराठी शब्द एकत्र जोडून युवराजांवर वार करत आहेत, तर काही जण व्यंगचित्रांद्वारे महाराजांवर शरसंधान करत आहेत. असो. आजच्या ह्या ब्लॉगचा विषय हा नाहीये. त्यानिमित्ताने  विचार करत असता विविध कारणांकरता होणारा डोळ्यांचा वापर  लक्षात येऊ लागला. इथे मुद्दा, डोळयांमधून सहजपणे व्यक्त होणारे भाव हा नसून डोळ्यांचा मुद्दाम होणारा वापर, असा आहे.  लहानपणची पहिली आठवण आहे ती प्राथमिक शाळेतल्या बाईंची. मुलं दंगा करू लागल्यावर त्यावर मोठा आवाज काढून त्या वर्गाला गप्प करत. मात्र त्यांच्या आवाजापेक्षा आम्हाला धाक होता तो त्यांच्या वटारलेल्या डोळ्यांचा. नंतर अनेकांना डोळे वटारताना मी पाहीले आहे. मात्र आमच्या त्या बाईंच्या डोळे वटारण्याची सर कुणालाही नाही. मे महिन्याच्या सुट्टीत डोळ्यांचा जेव्हढा वापर झाला तेव्हढा परत कधीही झाला नसेल. लॅडीस खेळताना आपल्या पा...