खूप लांबचा प्रवास करून आज घरी आलोय. अंग अगदी आंबून गेलंय. ताजंतवानं होण्यासाठी मसाज करून घ्यावा ह्या विचाराने जवळच्याच एका महागड्या स्पामधे निघालो आहे. मात्र मालिशवाल्या मामांची आठवण झाल्याशिवाय रहात नाहीये व त्यांच्या आठवणीनं डोळेही ओलावलेत..... माझी आणि मामांची ओळख तशी अचानकच झाली. अकरावी का बारावीत असताना एकदा खेळताना जोरात पडलो. त्या वयात तसं पडणं झडणं काही नवीन नव्हतं. पण ह्यावेळी जरा जोरातच पडलो. थोड्यावेळाने उठून पुन्हा खेळायला लागलो खरा, पण पाठच दुखायला लागली. घरी आलो व आईला सांगितलं. तिनं आपलं पाठीला तेल लाव, शेकून काढ, असले उपाय केले. पेनकिलरही दिली. पण पाठदुखी काही थांबेना. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांकडे निघालो होतो, तेव्हढ्यात आजोबांचे एक मित्र आले. "डॉक्टरकडे रे कशाला चाललायंस? त्या मामाकडे जा आणि त्याला सांग काय ते. मस्त मालिश करून देईल की दहा मिनिटात उड्या मारत घरी येशील. जा, त्या मारुतीच्या पलीकडच्या वाड्यात रहातो तो. आणि माझं नाव सांग बरं का..." थोडा विचार करून मीही डॉक्टरांकडे जाण्याऐवजी कोण त्या मामांकडे जायला निघालो. तिथे पोचलो तर एक म्हा...
मन आणि च'मन'चिडी, कुठल्या दिशेला उडतील, ह्याचा नेम नाही. ह्या ब्लॉग द्वारे मनात येणारे कुठलेही विचार तुमच्याशी शेअर करणार आहे. एखादा लेख, फोटो, प्रसंग, कविता, बातमी, काहीही, कधीही, कुठेही, काय जे वाटेल ते.... आवडल्यास कृपया 'लाइक' करा व तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.