फेसबुकवर अकाउंट उघडून तशी मला अनेक वर्षं झाली. फेबुवर नक्की कसल्या व कशासाठी पोष्टी टाकायच्या हेच मला कळत नव्हतं. त्यामुळे तो अकाउंट तसाच पडून होता. पण सुमारे एक वर्षांपूर्वीपासून पोष्टी टाकायला सुरुवात केली. झालं काय की आमच्या सोसायटीच्या हस्तलिखित मासिकात काही फुटकळ लिखाण करत होतो. सुमारे दोन वर्षात ते मासिक बंद पडलं. पण लिखाणाचा किडा चावला तो चावलाच. म्हणून मग हा ब्लॉग लिहायला लागलो. मग कुणीतरी सुचवलं की हे सगळं फेबुवर टाक. त्या गोष्टी फेबुवर टाकता टाकता इतर पोष्टीही टाकू लागलो. पोष्टी टाकल्यात म्हणताना लोक कॉमेंट्स टाकू लागले. अंगठे, स्मायल्या वगैरेतर पोत्यानं मिळू लागल्या. फेबुवर नक्की काय करतात हा प्रश्न आता मागे पडला. मधल्या काळात वपुंचं 'प्लेझर बॉक्स' वाचनात आलं. वाचकांची आलेली पत्रं व त्यांच्या प्रतिक्रिया यांचं अतिशय सुंदर संकलन व विश्लेषण वपुंनी केलं आहे. त्याकाळी पोष्टानं पत्र येत. त्यामुळे त्या पत्रपेटीला 'प्लेझर बॉक्स' असं अत्यंत समर्पक नावही वपुंनी दिलं. तसं खूप पूर्वी ते वाचलं होतं. पण त्यावेळी मी 'बा वाचका'च्या पामर भूमिकेत होतो....
मन आणि च'मन'चिडी, कुठल्या दिशेला उडतील, ह्याचा नेम नाही. ह्या ब्लॉग द्वारे मनात येणारे कुठलेही विचार तुमच्याशी शेअर करणार आहे. एखादा लेख, फोटो, प्रसंग, कविता, बातमी, काहीही, कधीही, कुठेही, काय जे वाटेल ते.... आवडल्यास कृपया 'लाइक' करा व तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.