मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

#Fight लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दोघी...

ही पहिली... उच्चशिक्षित. शाळेत असल्यापासूनच खूप हुषार. आता आयटी क्षेत्रातल्या नावाजलेल्या कंपनीमधे नोकरी. भलामोठा पगार.  नवराही अगदी शोभेलसा. शहराच्या उत्तम भागात सुरेखसे घर. दोघांच्याही आपापल्या चारचाकी, दुचाकी गाड्या. घरात काहीही कमी नाही. आज बऱ्याच दिवसांनी छोट्याला घेऊन आईकडे आली होती. आईला एकाच वेळी आश्चर्यही वाटलं होतं, आनंदही झाला होता, पण तिचा चेहरा पाहून जरा शंकेची पालही चुकचुकली होती. चहापाणी झाल्यावर हळूच आईनं विषय काढला आणि तिचा बांध फुटला. "........ लक्ष देत नाही...... रोज उशिरा येतो..... तोही खूप दारू पिऊन....विचारलं तर धड बोलत नाही....कधीमधी हात टाकतो.... बहुतेक बाहेर कुणी एक मैत्रीण असावी.....असं वाटतं की सरळ बॅग उचलावी व तुझ्याकडे निघून यावं....." आईनं नीट ऐकून घेतलं व एकेक पत्ता टाकत समजवायला सुरुवात केली. "......तुझ्या बाबांची इभ्रत........भावाचं स्थान......आम्ही केलेले संस्कार......लोक काय म्हणतील......छोट्याकडे बघून तरी विचार कर......तू सुद्धा काही कमी हट्टी नाहीयेस.....एकट्या बाईचं जगणं........." जन्मदात्या आईच्या कुशीतसुद्धा जागा ...