मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

#Nostalgia लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पेटीवाला

पुणे शहरातील एका अत्यंत स्ट्रॅटेजिक अशा नाक्यावर वर्षानुवर्षं आमचा कट्टा होता. अत्यंत प्रसिद्ध अशा पेठेतल्या एका महत्वाच्या रस्त्याला तिरपी टांग मारून एक पुणेरी बोळ जात असे. बरोब्बर त्याच स्ट्रॅटेजिक पॉइंटला एका बाजूला खास पुणेरी हॉटेल, जिथे अतिशय छान कॉफी मिळत असे, तर दुसऱ्या बाजूला अत्यंत चविष्ट असा कांदा उत्तप्पा खिलवणारे उडप्याचे हॉटेल होते. पलीकडेच एक गायन क्लास होता. त्याच्या पायऱ्या हा आमचा कट्टा. इतर कुठल्याही कट्ट्याप्रमाणे वाच्य व अर्वाच्य गप्पा हा आमच्याही कट्ट्याचा मुख्य उद्योग असला तरी जुनी हिंदी गाणी, अभिनेते व अभिनेत्री, क्रिकेट व क्रिकेटपटू हेही विषय आम्हाला वर्ज्य नव्हते. विशेषतः जुनी हिंदी गाणी जर सुरू झाली तर आम्हाला भंकस करायलाही आठवण राहायची नाही. या सगळ्याव्यतिरिक्त रस्त्यावरून येणारी जाणारी लोकं हा ही एक मनोरंजनाचा व निरीक्षणाचा सांस्कृतिक कार्यक्रम असायचा. क्वचित एखादेवेळी कट्ट्यावर एकटा जरी कोणी असेल तरी इतरजण येईपर्यंत नुसती लोकं बघण्यातही खूप वेळ जात असे. हातगाडीवाले, फेरीवाले, रिक्षावाले, सायकलवाले, नुकतीच लग्न झालेली जोडपी, म्हातारी जोडपी, आ...

दिवाळीचे दिवस

लेखाचा विषय वाचल्या वाचल्या अनेकांच्या मनात पहिला विचार आला असणार की , ' हं , घ्या अजून एक ' गेले ते दिवस ' छाप गळा काढणारा लेख '. तसे जर कोणाला वाटले असेल तर खरोखर मला आश्चर्य वाटणार नाही . ह्या पद्धतीचे अनेक लेख दर दिवाळीत आपल्यासमोर येत असतात . म्हणून मग ठरवले की माझ्या व्यवसायानिमित्त कळलेले विषय , आलेले अनुभव ह्या अनुषंगाने दिवाळीकडे पहावे . ऐन दिवाळीत बाहेर देशात जावे लागल्यामुळे तिथे पाहिलेल्या दिवाळीबद्दल लिहावे . अनेक जण अनेक वेळा मला विचारतात की आपल्या देशात हे एप्रिल ते मार्च असे आर्थिक वर्ष ठेवण्याचा आचरटपणा का करतात ? सरळ कॅलेंडर इयर का नाही करून टाकत ? नवीन युगात तसे करायला काहीही हरकत नाहीये . पण एक लक्षात घेऊ की यात आचरटपणा मात्र अजिबात नाहीये . आपला देश हा एक शेतीप्रधान देश आहे . आज इतकी औद्योगिक प्रगती करूनसुद्धा देशातील बहुसंख्य जनता शेतीवरच अवलंबून आहे . नीट विचार केलात तर एक लक्षात येईल की एप्रिल ते मार्च हे आर्थिक ...