मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

#Veg लेबलसह पोस्ट दाखवत आहे

व्रतवैकल्ये : एक विपर्यास

गेले काही दिवस जाता येता विविध हॉटेल्स (विशेषतः मांसाहारी) व धाब्यांच्या 'आखाड पार्टी' संबंधी मोठमोठ्या जाहिराती नजरेस पडत होत्या. कारण स्वच्छ होतं. पुढील काही दिवसात श्रावण महिना सुरु होणार होता. श्रावणात मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असल्यामुळे आत्ताच काय तो कोटा भरून घ्या, नंतर महिनाभर काहीही मिळणार नाहीये, या भावनेने मांसाहारप्रेमी मंडळी मोठ्या उत्साहाने ह्या आखाड पार्ट्यांचा आनंद लुटला. शाकाहारी मंडळी अर्थातच सर्व कोनांमधून नाकं मुरडून घेतली. त्यावर सोशल मीडियावर अनेक विनोद, चुटकुले व व्यंगचित्रे पसरली. आषाढाच्या शेवटच्या दिवसाला 'दिव्याची अमावस्या' म्हणावे का 'गटारी' म्हणावे यावर अनेक भावनाभरीत वादंग झडले. ज्यानं त्यानं आपल्याला हवं तेच केलं व अखेर श्रावण सुरु झाला. ह्या सगळ्या भानगडीत होतंय काय की ह्या व्रतवैकल्यांमागे जी काही शास्त्रीय कारणे आहेत त्याचा शोधच घेतला जात नाही. कारण ही व्रतवैकल्ये पाळणारी जी कर्मठ मंडळी आहेत ती केवळ 'बाबा वाक्यम प्रमाणं' या पद्धतीने त्याचं पालन करत आहेत तर बुद्धीप्रामाण्यवादी त्याचा शोध घेण्याऐवजी केवळ विरोध म्हणून न प...