पहायला गेलं तर तो होता एक अनामिक. पण खरं सांगायचं तर त्याला अनेक नावं होती. गावातले लोक त्याला कुठल्याही नावानं हाक मारत, पण त्याचं खरं नाव कुणालाच माहीत नव्हतं. कुणाला कशाला, खुद्द त्याला स्वतःलाही त्याचं स्वतःचं नाव माहीत नव्हतं. त्यातल्या त्यात शंकराच्या देवळातल्या गुरवीणबाईंनी ठेवलेलं 'नंदी' हे नाव पॉप्युलर होतं. नंदी इतका दुर्दैवी मी अद्याप कुठे पाहिला नाहीये. तो डोक्यानं थोडासा कमी होता. म्हणजे आजकालच्या भाषेत सांगायचं तर तो थोडासा 'गतिमंद' होता. गावातल्या जुन्या लोकांना नक्की आठवत होतं की तो धनगरांच्या एका तांड्याबरोबर गावात आला. असेल तेव्हा तीन चार वर्षांचा. तांड्यातल्या मेंढ्यांमागे रानात फिरायचा. किंवा मग बापाचं बोट धरून बाप जाईल तिथं जायचा. सगळ्या गावाला ही बापलेकाची जोडी माहीत पडली होती. त्याची एक विचित्र सवय होती. मेंढ्यांमागे फिरता फिरता हा पोरगा कुठेही झोपून जायचा. त्या बापाला रोज संध्याकाळी ह्याला येड्याला शोधून आणायचं एक कामंच लागलं होतं. एक दिवस तो तांडा निघून गेला. पण कसा कुणास ठाऊक, हा मागंच राहिला. निघायच्या गडबडीत आईबाप ह्याला विसरले का कुठेतर...
मन आणि च'मन'चिडी, कुठल्या दिशेला उडतील, ह्याचा नेम नाही. ह्या ब्लॉग द्वारे मनात येणारे कुठलेही विचार तुमच्याशी शेअर करणार आहे. एखादा लेख, फोटो, प्रसंग, कविता, बातमी, काहीही, कधीही, कुठेही, काय जे वाटेल ते.... आवडल्यास कृपया 'लाइक' करा व तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.