मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

#Poverty लेबलसह पोस्ट दाखवत आहे

बाप

त्याचं नाव कबांगा. नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की तो कुठला. काळाकभिन्न, उंचापुरा पण शिडशिडीत, जन्मल्या जन्मल्या म्हशीनं पाय दिल्यासारखं चपटं नाक, जाडजूड ओठ, कुठल्याही टूथपेस्ट किंवा टूथपावडरच्या जाहीरातीत शोभतील असे पांढरेशुभ्र दात, जीन्स व टी शर्ट घातलेला हा साधारण तिशीचा इसम त्याच्या देशातल्या एका कंपनीच्या गेस्ट हाऊसचा सर्व काही होता. सर्व काही म्हणजे स्वयंपाकी तोच, भांडी घासणारा तोच, कपडे धुऊन इस्त्री करणारा तोच, झाडणार पुसणार तोच, वॉचमनही तोच आणि माळीही तोच. ही सगळी कामं करून मागल्या बाजूला एका खोपटवजा खोलीत तो एकटा रहायचा. सदैव हसतमुख. कधीही कंटाळलेला किंवा वैतागलेला दिसायचा नाही. काम करताना सतत काहीतरी गुणगुणत असायचा. ऱ्हिदमचा खूप चांगला अंदाज होता. एकदा मी लॅपटॉपवर 'झिंगाट' मधलं गाणं लावलं होतं त्यावर सुरेख नाचला. नंतर चार दिवस रोज तेच गाणं.  हे सगळं घडलं, मी एकदा त्याच्या देशात, त्याच्या कंपनीत काही कामासाठी गेलो होतो तेव्हा. भल्या मोठ्या गेस्ट हाऊसमधे मी एकटाच होतो. त्यामुळे मला वेळ असेल तेंव्हा आम्ही दोघं खूप गप्पा मारायचो. कबांगा बऱ्यापैकी शिकले...

दामलेमास्तर

हो...! तोच तो मी दामलेमास्तर. 'बिगरी ते मॅट्रीक' मधला. माझ्या शिष्योत्तमानं, पुरुषोत्तमानं, ज्याच्यावर पानंच्या पानं खर्चली तो मीच. मीच तो सुलतान. मीच तो कर्दनकाळ, औरंगजेब, हरणटोळ. मीच तो पोरांना झोडून काढणारा. मीच तो पोरींना कावळे वगैरे म्हणणारा. मान्य आहे मला की कदाचित माझ्याकडून हे सगळं अति झालं असेल, पण आज थोडीशी माझीही बाजू समजून घ्या. तुम्ही म्हणाल, मास्तर आज इतक्या वर्षांनी तुम्हाला कशी काय उपरती झाली? सांगतो. परवाच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कुणीतरी गमतीत का होईना मला व माझे सहकारी चितळेमास्तर यांना उद्देशून एक पोस्ट टाकली. (आम्हीही हल्ली 'वर' बसून सगळं बघतो बरं). म्हणलं त्यानिमित्तानं इतक्या वर्षांत राहून गेलेलं बोलून घ्यावं. कोकणातल्या एका छोट्याशा खेड्यात माझा जन्म झाला. कोकणातल्या कुणाकडेही असत त्याप्रमाणे घरी थोडी कलमं, काजू, फणस होते. अर्ध्या खंडीची शेती होती. वडील साधे क्रमपाठी भिक्षुक होते. सहा बहीणी व तीन भाऊ धरून घरात आम्ही बारा चौदा तोंडं. खेड्यातले चार पाच यजमान व शंकराची रोजची पूजा यावर दोन वेळचं कसंबसं मिळायचं. अशा परिस्थितीत मॅट्रीक ह...