मुख्य सामग्रीवर वगळा

व्रतवैकल्ये : एक विस्तार

सुमारे महिन्यापूर्वी मी 'व्रतवैकल्ये : एक विपर्यास' या मथळ्याचा ब्लॉग लिहिला होता.  यात पत्री गोळा करण्याच्या पद्धतीबद्दल मी माझी मते व्यक्त केली होती. त्यावर अनेक प्रतिक्रिया पण आल्या. पण त्यातून मूळ विषयाचे निराकरण झाले नव्हते. परवा माझ्या एका ग्रुपमधील श्री. सुधीर लिमये यांनी एक माहीती फॉरवर्ड केली, ज्यातून कदाचित थोडीफार उकल होईल असे वाटते. आधीचा ब्लॉग या लिंकवर वाचा.

https://chamanchidi.blogspot.com/2018/08/blog-post_9.html

एकवीस पत्री..

आषाढ श्रावण मनोमिलन, पत्री पुष्प संमेलन।

1) तुळस मंजिरी गोजिरी, प्राणवायू दायिनी।

2) श्वेत दुर्वा..हरित दुर्वा, चर्मरोगांना म्हणती दूर व्हा.।

3) कुंतल पोषक रस माका, त्याला कधी दूर सारू नका।

4) बेल.
डावे पान ब्रह्माचे, उजवे पान विष्णू चे, पण त्रिदल करी नाश त्रिदोषांचे।

5) बोर..बदरी..
ओकारी, उमासे मळमळ अंतरी, सेवन करावी नटखट बदरी।

6)धोतरा..
   . गुंगी आणतो हा धोतरा, जनहो जरा जपून वापरा।

7) पिंपळ..
     कावीळ, वाचा दोषांवर गुणकारी, सदैव सळसळ, जणू वाजवी बासरी।

8) मधुमालती..
  . नाजूक गुलाबी मधुमालती, गुडघे, सांधे रक्षती।

9) शमी..
   पावसाळ्यातील अपचन, शमी चे रस प्राशन।

10) आघाडा..
       दातात कीड, पोटात बिघाडा, सहज,धावून येईल आघाडा।

11) डोरली..

   .   बलदायक, क्षुधावर्धक डोरली, भादव्यात बहरली।

12) कण्हेर..
     कुष्ठरोग, जूनाट इसब, यांनी त्रस्त? लावा कण्हेर मूळ उगाळून मस्त।

13) रुई..
    .  रुई अर्क लेप लावा, डोकेदुखी पळवून लावा।

14) अर्जुन.. सादडा..

      तालबद्ध ठेवा ह्रदय स्पंदन, सांगतसे वृक्ष अर्जुन।

15) विष्णूकांत..
      साक्षात विष्णू कांत, मेंदू बलवर्धक जबरदस्त।

16) डाळिंब..
       रक्तवर्धक रस पत्र, उपयुक्त सर्वत्र।

17) मरवा..
       सुगंधी रस मरवा, चर्मरोगांवर बरवा।

18) देवदार..
      अतिरिक्त वजन वाढीवर, उपयुक्त देवदार।

19) जाई...
       सेवन करा जाई, दृष्टी तीक्ष्ण होई।

20) केतकी..
       डोकेदुखीवर रामबाण, केतकीचे सुवर्णपान।

21) आगस्ती..
     .  सर्दीवर हमखास, आगस्तीचा सहवास।

*एकवीस पत्रींचे करूनी संवर्धन, श्री गणरायांचे करुया पूजन।।

आता कदाचित कुमारीकांना पत्री गोळा करायला का पाठवत त्याचा उलगडा झाल्यासारखे वाटते आहे.

© Milind Limaye
© chamanchidi.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून