पुलंनी एके ठिकाणी म्हणलंय की युनिफॉर्म घातला की साधा बॅंडवालापण टर्रेबाजी करतो. माझेही बहुतांशी अनुभव तसेच आहेत. आता युनिफॉर्म घातल्यामुळे टर्रेबाजी करायला हुरूप येतो का विशिष्ट काम करताना येणाऱ्या अनुभवांमुळे तसं वागलं जातं हा वेगळा विषय आहे. बट फॅक्ट रिमेन्स. मात्र अपवादात्मक का होईना, युनिफॉर्म मधल्या काही चेहऱ्यांबद्दलच्या माझ्या आठवणी पुष्कळ वेगळ्या आहेत. आठवणींच्या वादळात कितीतरी ओंडके आज एका लाटेनं जवळ येताहेत व दुसऱ्या लाटेनं लांब जाताहेत. लहानपणापासून ज्याची आपल्याला भीती घातली जाते तो पहिला युनिफॉर्म म्हणजे पोलीस. गप जेव नाहीतर पोलिसाला बोलवीन, या व अशा अनेक धमक्या आपण ऐकलेल्या असतात. त्यामुळे कुठेही पोलीस दिसला की पोटात बाकबुक होतंच. त्यात चित्रपटांमधे पाहिलेले पोलीस यात आणखी भरच घालतात. नंतरच्या काळात काही पोलीस मित्रही झाले, तसेच काही वर्गमित्र पोलीस झाले. त्यामुळे नाण्याची दुसरी बाजूही कळली. पण जो पोलीस माझ्या लक्षात आहे तो खूप वेगळा आहे. ह्या पोलिसाला मी पाहिलं त्याकाळी हवालदार मंडळी हाफ पॅन्ट व पठाणी सॅंडल घालून, पोटऱ्यांना खाकी रंगाच्या पट्ट्या ...
मन आणि च'मन'चिडी, कुठल्या दिशेला उडतील, ह्याचा नेम नाही. ह्या ब्लॉग द्वारे मनात येणारे कुठलेही विचार तुमच्याशी शेअर करणार आहे. एखादा लेख, फोटो, प्रसंग, कविता, बातमी, काहीही, कधीही, कुठेही, काय जे वाटेल ते.... आवडल्यास कृपया 'लाइक' करा व तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.