त्याचं नाव कबांगा. नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की तो कुठला. काळाकभिन्न, उंचापुरा पण शिडशिडीत, जन्मल्या जन्मल्या म्हशीनं पाय दिल्यासारखं चपटं नाक, जाडजूड ओठ, कुठल्याही टूथपेस्ट किंवा टूथपावडरच्या जाहीरातीत शोभतील असे पांढरेशुभ्र दात, जीन्स व टी शर्ट घातलेला हा साधारण तिशीचा इसम त्याच्या देशातल्या एका कंपनीच्या गेस्ट हाऊसचा सर्व काही होता. सर्व काही म्हणजे स्वयंपाकी तोच, भांडी घासणारा तोच, कपडे धुऊन इस्त्री करणारा तोच, झाडणार पुसणार तोच, वॉचमनही तोच आणि माळीही तोच. ही सगळी कामं करून मागल्या बाजूला एका खोपटवजा खोलीत तो एकटा रहायचा. सदैव हसतमुख. कधीही कंटाळलेला किंवा वैतागलेला दिसायचा नाही. काम करताना सतत काहीतरी गुणगुणत असायचा. ऱ्हिदमचा खूप चांगला अंदाज होता. एकदा मी लॅपटॉपवर 'झिंगाट' मधलं गाणं लावलं होतं त्यावर सुरेख नाचला. नंतर चार दिवस रोज तेच गाणं. हे सगळं घडलं, मी एकदा त्याच्या देशात, त्याच्या कंपनीत काही कामासाठी गेलो होतो तेव्हा. भल्या मोठ्या गेस्ट हाऊसमधे मी एकटाच होतो. त्यामुळे मला वेळ असेल तेंव्हा आम्ही दोघं खूप गप्पा मारायचो. कबांगा बऱ्यापैकी शिकले...
मन आणि च'मन'चिडी, कुठल्या दिशेला उडतील, ह्याचा नेम नाही. ह्या ब्लॉग द्वारे मनात येणारे कुठलेही विचार तुमच्याशी शेअर करणार आहे. एखादा लेख, फोटो, प्रसंग, कविता, बातमी, काहीही, कधीही, कुठेही, काय जे वाटेल ते.... आवडल्यास कृपया 'लाइक' करा व तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.