मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

#Artist लेबलसह पोस्ट दाखवत आहे

तिची गाणी, त्याची गाणी - ऋषी कपूर

ऋषी कपूर म्हणल्याक्शणी आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो एक चॉकलेट हीरो. गुलजार , देखणा , हॅण्डसम , टिपिकल कपूर. रोमॅंटिक भूमिका , नाच , गाणी या पलीकडे आपण त्याला आठवू शकत नाही. पण ऋषी एक अत्यंत समर्थ अभिनेता होता. चित्रपटसृष्टी केवळ त्याच्या रोमॅंटिक इमेजचा फायदा घेत राहिली. तो तिथला भाग आहे. मात्र आपण त्याच्या गाण्यांबद्दल व अभिनयाबद्दल न बोलणे हा त्याच्यावर अन्याय होईल. वडील राज कपूर यांच्या प्रमाणेच ऋषीला सूर व शब्द यांची अचूक जाण होती. अजून एक गोष्ट त्याने त्यांच्याकडून घेतली होती , ती म्हणजे , अतिशय बोलका व क्षणात भाव बदलणारा चेहरा. आणि ह्याच दोन गोष्टींसाठी ' त्याची गाणी ' सदरासाठी तो पात्र ठरतो. सत्तर व ऐंशीच्या दशकांमधली त्याची अनेक गाणी आपण आजही ऐकतो , गुणगुणतो. पण आज काही गाणी अशी आठवूया की जी एरवी आपण म्हणतोच असे नाही. जीतेंद्र व रीना रॉय यांच्याबरोबर त्याचा ' बदलते रिश्‍ते ' नावाचा एक , तसा कमी प्रसिद्ध , चित्रपट आहे. ऋषीचे व रीनाचे कॉलेज मधे प्रेम असते. पण नंतर तिचे लग्न जीतेंद्र बरोबर होते. ती त्याला विसरलेली नसते. त्यामुळे काही काळानंतर योगायोगाने तो परत...

तिची गाणी, त्याची गाणी - मीनाकुमारी

मीनाकुमारी ही एक अभिजात अभिनेत्री होती. हिंदी चित्रपटांचा इतिहास लिहिताना तिचा नंबर फारच वरचा लागेल. लागेल कशाला , लागतोच. बालकलाकार म्हणून तिने कारकीर्द सुरू केली. ' बच्चो का खेल ' या १९४६ साली आलेल्या चित्रपटातून तिने नायिकेच्या भूमिका करायला सुरूवात केली. सुरुवातीला वीर घटोत्कच , हनुमान पाताळविजय , असल्या बी ग्रेड पौराणिक चित्रपटातून कामे केल्यावर , १९५२ साली आला ' बैजू बावरा '. तिथून मात्र ती सुटलीच. एक से एक भूमिका करत तिने स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. आमच्या कंपूत काही जण तिचे चाहते नव्हते. त्यांच्या माहितीप्रमाणे ती तोंडाला अंड्याचा फेस पॅक लावत असे व त्यामुळे तिचा चेहरा सदैव ताणलेला असे. त्यामुळे अभिनय करायचा प्रश्नच उरत नाही असे त्यांचे म्हणणे होते. फेसपॅक वगैरे खरे असेलही. अनेक वेळा चेहरा ताणल्यासारखा दिसेही. पण हे पूर्णपणे खरे नाही. कारण खरी ताकत होती ती डोळ्यांमधे. तिच्या काही गाण्यांमधे सुद्धा हे प्रकर्षाने लक्षात येते. मीनाकुमारीची गाणी म्हणल्यावर मला सर्वप्रथम आठवते ते ' दिल एक मंदीर ' मधले ' रूक जा रात , ठहर जा रे चंदा ...

पणजोबांचं घड्याळ

शा ळेत असताना मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही भावंडे आजोळी जमत असू . दिवसभर दंगा , खेळ , नदीवर पोहायला जाणे , संध्याकाळी शेतात जाणे असा भरगच्च कार्यक्रम असे . मात्र दुपारच्या वेळी आमची आजी कुठेही जाऊ देत नसे . मग आमची तिच्यामागे भुणभुण सुरू होई , आजी , मी काय करू ? बोअर झालंय . इ . इ . मग आम्हाला गुंतवून ठेवायला कधी कधी ती माळा आवरायची टूम काढत असे . आमचे आजोळघर जुन्या काळचे भलेमोठे घर होते . त्यामुळे त्याचा माळा सुद्धा मोठा होता . आजी म्हणत असे , ' चला , सगळे मिळून माळ्यावरचे भंगार काढू या '. आम्ही सगळे उत्साहाने कामाला लागत असू . एक एक गाठोडे , एक एक पेटी , उघडली जात असे . काय काय सापडायचे ? खरं तर काय काय नाही सापडायचे ? जुने फोटोंचे आल्बम , मामाचे यत्ता चौथीचे प्रगती पुस्तक , आजोबांच्या आर्मीमधल्या वस्तू , ताईमावशीच्या , आईच्या , कसल्या कसल्या कलाकृती , यत्ता नववीचे मराठीचे पुस्तक , आजीच्या जुन्या विणकामाच्या सुया , पणजोबांचे अतिशय चांगल्या स्थितीतले पण बंद पडलेले , ...