ऋषी कपूर म्हणल्याक्शणी आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो एक चॉकलेट हीरो. गुलजार , देखणा , हॅण्डसम , टिपिकल कपूर. रोमॅंटिक भूमिका , नाच , गाणी या पलीकडे आपण त्याला आठवू शकत नाही. पण ऋषी एक अत्यंत समर्थ अभिनेता होता. चित्रपटसृष्टी केवळ त्याच्या रोमॅंटिक इमेजचा फायदा घेत राहिली. तो तिथला भाग आहे. मात्र आपण त्याच्या गाण्यांबद्दल व अभिनयाबद्दल न बोलणे हा त्याच्यावर अन्याय होईल. वडील राज कपूर यांच्या प्रमाणेच ऋषीला सूर व शब्द यांची अचूक जाण होती. अजून एक गोष्ट त्याने त्यांच्याकडून घेतली होती , ती म्हणजे , अतिशय बोलका व क्षणात भाव बदलणारा चेहरा. आणि ह्याच दोन गोष्टींसाठी ' त्याची गाणी ' सदरासाठी तो पात्र ठरतो. सत्तर व ऐंशीच्या दशकांमधली त्याची अनेक गाणी आपण आजही ऐकतो , गुणगुणतो. पण आज काही गाणी अशी आठवूया की जी एरवी आपण म्हणतोच असे नाही. जीतेंद्र व रीना रॉय यांच्याबरोबर त्याचा ' बदलते रिश्ते ' नावाचा एक , तसा कमी प्रसिद्ध , चित्रपट आहे. ऋषीचे व रीनाचे कॉलेज मधे प्रेम असते. पण नंतर तिचे लग्न जीतेंद्र बरोबर होते. ती त्याला विसरलेली नसते. त्यामुळे काही काळानंतर योगायोगाने तो परत...
मन आणि च'मन'चिडी, कुठल्या दिशेला उडतील, ह्याचा नेम नाही. ह्या ब्लॉग द्वारे मनात येणारे कुठलेही विचार तुमच्याशी शेअर करणार आहे. एखादा लेख, फोटो, प्रसंग, कविता, बातमी, काहीही, कधीही, कुठेही, काय जे वाटेल ते.... आवडल्यास कृपया 'लाइक' करा व तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.