मुख्य सामग्रीवर वगळा

कॉर्पोरेट दिंडी - एक कटीपतंग

अगदी बालवर्गात असल्यापासून, मी पुण्यात येणारी दिंडी पहायला जातो आहे. पुढे शालेय जीवनात प्रत्यक्ष दिंडीतही भाग घेतला. माझ्या आठवणीतले वारकरी हे पूर्णपणे ग्रामीण भागातून आलेले, सर्वसाधारणपणे शेतकरी किंवा बलुतेदार वर्गातील असत. पुणेकर सामान्य नागरीकांचा सहभाग तसा मर्यादीतच होता. वारीचे स्वागत, वारकरी मंडळींची व्यवस्था यात कुठे कमतरता नसे, मुक्कामाच्या रात्री होणार्‍या भजन, कीर्तनाच्या कार्यक्रमात पुरेपूर सहभागही असे. पण आपण वारकरी नाही, आपला रोल काय आहे, हे माहीत असे. जो तो आपापला रोल नीट पार पाडत असे.

मात्र गेली काही वर्षं, दिखाव्यासाठी म्हणून वारीत जाण्याची पद्धत आली आहे. त्याचं नवलंही वाटतं व खेदही होतो. नाही, वारीत जाण्याबद्दल objection नाहीये. खेद होतो तो वारीचा मूळ गाभा समजून न घेता, केवळ सेल्फी काढणं, त्या विविध सोशल मीडिया वर टाकणं, सासवड पर्यंत चालून आल्यावर, संध्याकाळी 'श्रमपरिहार' करणं, याचा. मी या अशा काही so called वारकऱ्यांची मुलाखत घेतली. हे सर्व जण कॉर्पोरेट क्षेत्रात विविध स्तरांवर काम करणारे नोकरदार अथवा उच्चशिक्षित व्यावसायिक होते. मिळालेली उत्तरे अत्यंत मजेशीर व तितकीच अंतर्मुख करणारी होती.

१. तुकाराम हे ज्ञानेश्वरांचे वडील होते. का तर 'ग्यानबा तुकाराम' असे म्हणतात.
२. वारी पुण्याहून 'आषाढीला' जाते. (पंढरपूरचा पत्ता कट).
३. हे सगळे लोक (वारकरी) दरवर्षी कुठल्या ओढीनं वारीत येतात - माहीत नाही
४. तुम्ही वारीत का आलात - माहीत नाही, चिल मारायला, तेव्हढाच चेंज इ. इ.
५. 'एक तरी ओवी अनुभवावी' हे माहीत आहे का - म्हणजे काय, what the ****, who cares....

स्वतःशी विचार करत बसलो होतो. का हे असं?  वारीतील उस्फूर्त सहभागावर लोकांनी पीएचडी केल्या, अनेक पाश्चात्य मंडळी आजही हे शोधत बसली आहेत की कुठलंही बोलावणं नसताना, कशाचाही ठिकाणा नसताना इतकी लोकं विशिष्ट ओढीनं का जमतात? आणि दुसऱ्या बाजूला ही अशी उत्तरं....

मला असं वाटतंय की आपण सर्व जगण्याचा अर्थ विसरलो आहोत. तो वारकरी सर्व कामं पार पाडत, शेवटी त्या 'विठूराया' चरणी धाव घेतो. आम्हाला मात्र माहीतच नाही की कुठे पोचायचंय...

मांजा कापला गेलेला 'कटी पतंग' झालाय बहुधा.... 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत