हिंदी चित्रपटसृष्टीतील एक काळ देव , दिलीप आणि राज यांनी गाजवला. एकूणच सुवर्णयुग होते ते. गीत , संगीत , नृत्य , अभिनय , प्रत्येक बाबतीत. ह्या तिघांची , विशेषतः दिलीप आणि राज कपूर यांची गाणी , त्यातल्या अभिनयासाठी सुद्धा लक्षात राहीली आहेत , राहतील. या तिघांपैकी राज कपूर हा यशस्वी दिग्दर्शकही होता. (यातील यशस्वी हा शब्द महत्वाचा). मात्र स्वतःचे असोत किंवा दुसर्या दिग्दर्शकांचे असोत , राज कपूरनी अभिनयाच्या बाबतीत डावे उजवे कधीच केले नाही. अर्थातच आज त्याच्या गाण्यांविषयी बोलताना हे महत्वाचे ठरेल. कारण ' त्याच्या ' गाण्यांबद्दल बोलताना काही गाणी अशीही असणार आहेत , जी त्यानी गायलेलीच नाहीयेत. Confusing? बघूया... देव व दिलीप यांना राज कपूर सारखी परंपरा नव्हती. राजकपूरचे वडील पृथ्वीराज कपूर हे हिंदी नाटक क्षेत्रातील व नंतर हिंदी चित्रपटातील एक नामवंत कलाकार होते. जुन्या पिढीतील रसिकांना आजही त्यांचा ' सिकंदर ' आणि मुघले आझम मधला ' अकबर ' नक्की आठवतो. जरी वडिलांकडून वारसा मिळाला , तरी राजकपूरने स्वतःची विशिष्ट शैली विकसित केली. ह्या शैलीवर चार्ली चॅप्लिनच्या ...
मन आणि च'मन'चिडी, कुठल्या दिशेला उडतील, ह्याचा नेम नाही. ह्या ब्लॉग द्वारे मनात येणारे कुठलेही विचार तुमच्याशी शेअर करणार आहे. एखादा लेख, फोटो, प्रसंग, कविता, बातमी, काहीही, कधीही, कुठेही, काय जे वाटेल ते.... आवडल्यास कृपया 'लाइक' करा व तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.