मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

#HindiSongs लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पेटीवाला

पुणे शहरातील एका अत्यंत स्ट्रॅटेजिक अशा नाक्यावर वर्षानुवर्षं आमचा कट्टा होता. अत्यंत प्रसिद्ध अशा पेठेतल्या एका महत्वाच्या रस्त्याला तिरपी टांग मारून एक पुणेरी बोळ जात असे. बरोब्बर त्याच स्ट्रॅटेजिक पॉइंटला एका बाजूला खास पुणेरी हॉटेल, जिथे अतिशय छान कॉफी मिळत असे, तर दुसऱ्या बाजूला अत्यंत चविष्ट असा कांदा उत्तप्पा खिलवणारे उडप्याचे हॉटेल होते. पलीकडेच एक गायन क्लास होता. त्याच्या पायऱ्या हा आमचा कट्टा. इतर कुठल्याही कट्ट्याप्रमाणे वाच्य व अर्वाच्य गप्पा हा आमच्याही कट्ट्याचा मुख्य उद्योग असला तरी जुनी हिंदी गाणी, अभिनेते व अभिनेत्री, क्रिकेट व क्रिकेटपटू हेही विषय आम्हाला वर्ज्य नव्हते. विशेषतः जुनी हिंदी गाणी जर सुरू झाली तर आम्हाला भंकस करायलाही आठवण राहायची नाही. या सगळ्याव्यतिरिक्त रस्त्यावरून येणारी जाणारी लोकं हा ही एक मनोरंजनाचा व निरीक्षणाचा सांस्कृतिक कार्यक्रम असायचा. क्वचित एखादेवेळी कट्ट्यावर एकटा जरी कोणी असेल तरी इतरजण येईपर्यंत नुसती लोकं बघण्यातही खूप वेळ जात असे. हातगाडीवाले, फेरीवाले, रिक्षावाले, सायकलवाले, नुकतीच लग्न झालेली जोडपी, म्हातारी जोडपी, आ...

तिची गाणी, त्याची गाणी - ऋषी कपूर

ऋषी कपूर म्हणल्याक्शणी आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो एक चॉकलेट हीरो. गुलजार , देखणा , हॅण्डसम , टिपिकल कपूर. रोमॅंटिक भूमिका , नाच , गाणी या पलीकडे आपण त्याला आठवू शकत नाही. पण ऋषी एक अत्यंत समर्थ अभिनेता होता. चित्रपटसृष्टी केवळ त्याच्या रोमॅंटिक इमेजचा फायदा घेत राहिली. तो तिथला भाग आहे. मात्र आपण त्याच्या गाण्यांबद्दल व अभिनयाबद्दल न बोलणे हा त्याच्यावर अन्याय होईल. वडील राज कपूर यांच्या प्रमाणेच ऋषीला सूर व शब्द यांची अचूक जाण होती. अजून एक गोष्ट त्याने त्यांच्याकडून घेतली होती , ती म्हणजे , अतिशय बोलका व क्षणात भाव बदलणारा चेहरा. आणि ह्याच दोन गोष्टींसाठी ' त्याची गाणी ' सदरासाठी तो पात्र ठरतो. सत्तर व ऐंशीच्या दशकांमधली त्याची अनेक गाणी आपण आजही ऐकतो , गुणगुणतो. पण आज काही गाणी अशी आठवूया की जी एरवी आपण म्हणतोच असे नाही. जीतेंद्र व रीना रॉय यांच्याबरोबर त्याचा ' बदलते रिश्‍ते ' नावाचा एक , तसा कमी प्रसिद्ध , चित्रपट आहे. ऋषीचे व रीनाचे कॉलेज मधे प्रेम असते. पण नंतर तिचे लग्न जीतेंद्र बरोबर होते. ती त्याला विसरलेली नसते. त्यामुळे काही काळानंतर योगायोगाने तो परत...

तिची गाणी, त्याची गाणी - मीनाकुमारी

मीनाकुमारी ही एक अभिजात अभिनेत्री होती. हिंदी चित्रपटांचा इतिहास लिहिताना तिचा नंबर फारच वरचा लागेल. लागेल कशाला , लागतोच. बालकलाकार म्हणून तिने कारकीर्द सुरू केली. ' बच्चो का खेल ' या १९४६ साली आलेल्या चित्रपटातून तिने नायिकेच्या भूमिका करायला सुरूवात केली. सुरुवातीला वीर घटोत्कच , हनुमान पाताळविजय , असल्या बी ग्रेड पौराणिक चित्रपटातून कामे केल्यावर , १९५२ साली आला ' बैजू बावरा '. तिथून मात्र ती सुटलीच. एक से एक भूमिका करत तिने स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. आमच्या कंपूत काही जण तिचे चाहते नव्हते. त्यांच्या माहितीप्रमाणे ती तोंडाला अंड्याचा फेस पॅक लावत असे व त्यामुळे तिचा चेहरा सदैव ताणलेला असे. त्यामुळे अभिनय करायचा प्रश्नच उरत नाही असे त्यांचे म्हणणे होते. फेसपॅक वगैरे खरे असेलही. अनेक वेळा चेहरा ताणल्यासारखा दिसेही. पण हे पूर्णपणे खरे नाही. कारण खरी ताकत होती ती डोळ्यांमधे. तिच्या काही गाण्यांमधे सुद्धा हे प्रकर्षाने लक्षात येते. मीनाकुमारीची गाणी म्हणल्यावर मला सर्वप्रथम आठवते ते ' दिल एक मंदीर ' मधले ' रूक जा रात , ठहर जा रे चंदा ...

तिची गाणी, त्याची गाणी - राज कपूर

हिंदी चित्रपटसृष्टीतील एक काळ देव , दिलीप आणि राज यांनी गाजवला. एकूणच सुवर्णयुग होते ते. गीत , संगीत , नृत्य , अभिनय , प्रत्येक बाबतीत. ह्या तिघांची , विशेषतः दिलीप आणि राज कपूर यांची गाणी , त्यातल्या अभिनयासाठी सुद्धा लक्षात राहीली आहेत , राहतील. या तिघांपैकी राज कपूर हा यशस्वी दिग्दर्शकही होता. (यातील यशस्वी हा शब्द महत्वाचा). मात्र स्वतःचे असोत किंवा दुसर्‍या दिग्दर्शकांचे असोत , राज कपूरनी अभिनयाच्या बाबतीत डावे उजवे कधीच केले नाही. अर्थातच आज त्याच्या गाण्यांविषयी बोलताना हे महत्वाचे ठरेल. कारण ' त्याच्या ' गाण्यांबद्दल बोलताना काही गाणी अशीही असणार आहेत , जी त्यानी गायलेलीच नाहीयेत. Confusing? बघूया... देव व दिलीप यांना राज कपूर सारखी परंपरा नव्हती. राजकपूरचे वडील पृथ्वीराज कपूर हे हिंदी नाटक क्षेत्रातील व नंतर हिंदी चित्रपटातील एक नामवंत कलाकार होते. जुन्या पिढीतील रसिकांना आजही त्यांचा ' सिकंदर ' आणि मुघले आझम मधला ' अकबर ' नक्की आठवतो. जरी वडिलांकडून वारसा मिळाला , तरी राजकपूरने स्वतःची विशिष्ट शैली विकसित केली. ह्या शैलीवर चार्ली चॅप्लिनच्या ...

तिची गाणी, त्याची गाणी - वहीदा रहमान

वहीदा रहमान ही एक अतिशय सशक्त व समर्थ अभिनेत्री होती , आजही आहे.   यात कुठलेही दुमत असायचे कारण नाही . गाइड मधली रोझी असो , खामोषी मधली नर्स असो किंवा तीसरी कसम मधली हीराबाई असो , वहीदाने ह्या भूमिका अमर करून ठेवल्या आहेत . एक अतिशय ग्रेसफुल पण तितकीच मर्यादाशील अशी ही अभिनेत्री . कुठल्याही चित्रपटातील कुठलीही भूमिका घ्या . वहीदाने कधीही , कुठेही चीप वागल्याचे वा दिसल्याचे आठवणार नाही . तोच डौल , तोच संयमी अभिनय , तीच १०० % देण्याची वृत्ती . तीसरी कसम मधे ती हिराबाई दिसते , गाइड मधे रोझी वाटते , बीस साल बाद मधे गांव की छोरी म्हणून कुठेही कमी पडत नाही आणि देल्ही 6 मधे आजी म्हणून ही  शोभते . नो वंडर , तिच्या अनेक भूमिका गाजल्या . जो अभिनय संवाद बोलताना तोच अभिनय गाताना . आणि त्यामुळेच ' तिची गाणी ' आठवणे आपल्यासाठी मस्ट आहे . पहिल्या प्रथम आठवते ते सी आय डी मधले ' कहीं पे निगाहे , कहीं पे निशाना ' हे तिचे तिच्या पहिल्या हिंदी चित्रपटातील गाणे . त्याआध...