कळायला लागल्यापासूनचं आठवत गेलो, तर सुरूवातीची एक पाच-सात वर्षं सोडल्यास गेली सुमारे पंचेचाळीस वर्षं मी चहा पितोय. सुरूवातीची वर्षं मात्र अति तापदायक होती. खरं म्हणजे चहा हवा असायचा, पण एक तर 'चहा मिळणार नाही, रात्री झोपायचा नाहीस' हे तरी ऐकायला लागायचं किंवा 'चहा पिऊ नको हो, काळा होशील' हे तरी. ह्या दोन्ही सबबी खरं तर अत्यंत टुकार आणि खोट्या आहेत. पण सांगणार कुणाला? डोक्याला डोकं आपटलं की शिंगं उगवतात, पेरूची बी गिळली की पोटातून झाड येतं, बेडकीला दगड मारला की मुकी बायको मिळते.... काय अन काय. ते वयच ह्या आणि असल्या भाकड कथांवर विश्वास ठेवण्याचं होतं. चहासंबंधी सबबी त्यातल्याच. हळूहळू कुणा काकामामाच्या मेहेरबानीने अर्धी बशी चहा मिळू लागला. मग काही दिवसांनी आजोळी गेल्यानंतर आजी 'चाय कम, दूध ज्यादा' देऊ लागली. त्या पेयाला चहा म्हणणं चुकीचं होतं. पण निदान थोडा का होईना, चहा मिळतोय याचा आम्हाला आनंद, तर त्यानिमित्तानं पोरं दूध प्यायल्याचा आजीला आनंद. शेतावर जायला मात्र मी ज्याम खूष असायचो. इतर अनेक कारणं होती, पण शेतात गेल...
मन आणि च'मन'चिडी, कुठल्या दिशेला उडतील, ह्याचा नेम नाही. ह्या ब्लॉग द्वारे मनात येणारे कुठलेही विचार तुमच्याशी शेअर करणार आहे. एखादा लेख, फोटो, प्रसंग, कविता, बातमी, काहीही, कधीही, कुठेही, काय जे वाटेल ते.... आवडल्यास कृपया 'लाइक' करा व तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.