बापू..... नक्की कोण होता हे मला आजतागायत माहिती नाहीये. पण बहुधा शेतकरी असावा. माझ्या आजोळी, बहुतेक सगळे शेतकरीच होते. त्यामुळे बापूसुद्धा अर्थातच शेतकरी असणार, असा मी अंदाज बांधलाय. मातकट रंगाचं धोतर, तशाच रंगाचा शर्ट व गांधी टोपी, पायात जाड पायताण असा त्याचा वेष असे. मध्यम उंची, किरकोळ अंग, तोंडातले निम्मे दात गायब असा त्याचा अवतार होता. हसला की तोंडाचं अर्ध बोळकं व उरलेले, तंबाकू खाऊन पिवळे झालेले, दात नीट दिसायचे. सुमारे पन्नाशीचा हा काळासावळा माणूस माझ्या आजोबांकडे कशासाठी येत असे हे मला कधीच कळलं नाही. आला की आधी माझ्या आजीकडे जायचा व हक्कानं चहा प्यायचा. कधी तिची काही छोटीमोठी कामं करायचा. मग आजोबांकडे जाऊन, त्यांच्या चांदीच्या डबीतला तंबाकू खायचा. बहुतेक वेळा शेतीसंबंधी काहीबाही बोलत बसायचा. क्वचित काही न बोलता, ओटीवर बसून आकाशाकडे बघत बसायचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी गेलो की हा हमखास भेटायचा. मी, माझी आई, माझा धाकटा भाऊ, असे सगळे जणू त्याचेच पाहुणे असल्यासारखा आनंदून जायचा. माझा भाऊ मला दादा म्हणतो म्हणून बापू पण मला दादा म्...
मन आणि च'मन'चिडी, कुठल्या दिशेला उडतील, ह्याचा नेम नाही. ह्या ब्लॉग द्वारे मनात येणारे कुठलेही विचार तुमच्याशी शेअर करणार आहे. एखादा लेख, फोटो, प्रसंग, कविता, बातमी, काहीही, कधीही, कुठेही, काय जे वाटेल ते.... आवडल्यास कृपया 'लाइक' करा व तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.