मागल्या वर्षीच्या लॉकडाऊननंतर अनेक क्लिप्स समाजमाध्यमांवर फिरत आहेत. आपणही अशा अनेक पाहिल्या असतील. पण ज्या दोन क्लिप्सनी मला अनेक दिवस निःशब्द केलं त्या आज तुमच्याशी शेअर करतोय. प्रत्येक वेळी ह्या क्लिप्स पाहिल्यावर 'किती वानू यांसी', किती वाखाणणी करू यांची, हा एकच विचार मनात घोळत रहातो.
एक आहे महामारीच्या उद्रेकात पंढरीला जाता येणार नाही असं सांगणाऱ्या पोलिसालाच पांडुरंग मानून, त्याच्या पाया पडून माघारी निघणारा वारकरी. अनेक दिवस मैलोनमैल चालून आल्यानंतर, फक्त कळसाचे दर्शन घेऊन, 'जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता', असं म्हणणाऱ्या तुकोबांच्या वारकऱ्याची श्रद्धा काय असते ते कळणं, वाटतं तितकं सोपं नाहीये. इथे तर कळसही दिसणं शक्य नाही म्हणताना सहजपणे त्या पोलिसातच पांडुरंग बघणारा हा वारकरी.
दुसरी आहे एक कोणी म्हातारी. भिकारीण म्हणावं का तिला? पण क्लिप पाहिल्यानंतर तिला भिकारीण म्हणता येईल? दोन चार दिवस पोटाला अन्न नाही. कुणीतरी एक अनामिक स्वयंसेवक पाण्याची बाटली व अन्नाचं पॅकेट देतो तर, पदराची गाठ सोडवून म्हातारी एक नोट पुढे करते. का? काय नक्की असेल तिच्या मनात? अनेक लोक शिजवलेलं अन्न फुकट घेऊ नये अशी भावना मनाशी ठेऊन असतात. ह्या म्हातारीचीही तीच भावना असेल? आणि समजा असली तरी मिळतंय आत्ता तर घेऊन ठेऊ, पदरचे पैसे उद्या उपयोगी पडतील, असं एकदाही तिला वाटू नये? क्षणाचाही विचार न करता ती स्वतःजवळची शेवटची नोट सहजपणे देऊ करते?
काय म्हणू याला?
श्रद्धा? संस्कार? आपली संस्कृती? कशातून येते ही पराकोटीची भावना?
माझी आजी म्हणायची तेच कदाचित खरं...
जग चालतं ते फक्त या लोकांमुळे...
(दोन्ही क्लिप्सचे श्रेय त्यांच्या निर्मात्यांचे, ज्यांची नावं दुर्दैवाने मला माहीत नाहीत.)
Ⓒ मिलिंद लिमये
हेम्न: संलक्षते ह्यग्नौ
उत्तर द्याहटवाविशुद्धी: श्यामिकाSपिवा ||
सोन्याचा कस अग्निमधेच लागतो. कठीण समयी सोन झळाळून निघत. दोन्ही घटना हे सार्थ ठरवत आहेत.
त्यांचे भाव समजुन घ्यायला आपल्याला त्यांच्या भूमिकेतच जायला पाहिजे. 🙏🏼🙏🏼
Dhanyawad...
हटवाKharokhar.....ashaach lokaanmule jag chaalta aani ashaannach baghun ya jagaat rahaavasa vaatata.
उत्तर द्याहटवाVandan ya maulinna
Kharokhar....ashaa lokaanmule jag chaalta aani ashaanmulech ya jagaat rahaavasa vaatata.
उत्तर द्याहटवाVandan ya maulinna
Kharokhar.....ashaach lokaanmule jag chaalta aani ashaannach baghun ya jagaat rahaavasa vaatata.
उत्तर द्याहटवाVandan ya maulinna
Kharokhar.....ashaach lokaanmule jag chaalta aani ashaannach baghun ya jagaat rahaavasa vaatata.
उत्तर द्याहटवाVandan ya maulinna
Aflatoon. Tya mhatarya ajincha video baghtana khupach yaatana hotat
उत्तर द्याहटवाAflatoon. Tya mhatarya ajincha video baghtana khupach yaatana hotat
उत्तर द्याहटवाजग चालते ते अशा माणसांमुळे
उत्तर द्याहटवाThanks...!!!
हटवाSo touching.... khare sant mahant ase ch astil
उत्तर द्याहटवाThanks Priya.
हटवा