मुख्य सामग्रीवर वगळा

किती वानू यांसी...

मागल्या वर्षीच्या लॉकडाऊननंतर अनेक क्लिप्स समाजमाध्यमांवर फिरत आहेत. आपणही अशा अनेक पाहिल्या असतील. पण ज्या दोन क्लिप्सनी मला अनेक दिवस निःशब्द केलं त्या आज तुमच्याशी शेअर करतोय. प्रत्येक वेळी ह्या क्लिप्स पाहिल्यावर 'किती वानू यांसी', किती वाखाणणी करू यांची, हा एकच विचार मनात घोळत रहातो. 

एक आहे महामारीच्या उद्रेकात पंढरीला जाता येणार नाही असं सांगणाऱ्या पोलिसालाच पांडुरंग मानून, त्याच्या पाया पडून माघारी निघणारा वारकरी. अनेक दिवस मैलोनमैल चालून आल्यानंतर, फक्त कळसाचे दर्शन घेऊन, 'जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता', असं म्हणणाऱ्या तुकोबांच्या वारकऱ्याची श्रद्धा काय असते ते कळणं, वाटतं तितकं सोपं नाहीये. इथे तर कळसही दिसणं शक्य नाही म्हणताना सहजपणे त्या पोलिसातच पांडुरंग बघणारा हा वारकरी.


दुसरी आहे एक कोणी म्हातारी. भिकारीण म्हणावं का तिला? पण क्लिप पाहिल्यानंतर तिला भिकारीण म्हणता येईल? दोन चार दिवस पोटाला अन्न नाही. कुणीतरी एक अनामिक स्वयंसेवक पाण्याची बाटली व अन्नाचं पॅकेट देतो तर, पदराची गाठ सोडवून म्हातारी एक नोट पुढे करते. का? काय नक्की असेल तिच्या मनात? अनेक लोक शिजवलेलं अन्न फुकट घेऊ नये अशी भावना मनाशी ठेऊन असतात. ह्या म्हातारीचीही तीच भावना असेल? आणि समजा असली तरी  मिळतंय आत्ता तर घेऊन ठेऊ, पदरचे पैसे उद्या उपयोगी पडतील, असं एकदाही तिला वाटू नये? क्षणाचाही विचार न करता ती स्वतःजवळची शेवटची नोट सहजपणे देऊ करते?


काय म्हणू याला? 

श्रद्धा? संस्कार? आपली संस्कृती? कशातून येते ही पराकोटीची भावना?

माझी आजी म्हणायची तेच कदाचित खरं... 

जग चालतं ते फक्त या लोकांमुळे... 


(दोन्ही क्लिप्सचे श्रेय त्यांच्या निर्मात्यांचे, ज्यांची नावं दुर्दैवाने मला माहीत नाहीत.) 

Ⓒ मिलिंद लिमये

 

टिप्पण्या

  1. हेम्न: संलक्षते ह्यग्नौ
    विशुद्धी: श्यामिकाSपिवा ||

    सोन्याचा कस अग्निमधेच लागतो. कठीण समयी सोन झळाळून निघत. दोन्ही घटना हे सार्थ ठरवत आहेत.

    त्यांचे भाव समजुन घ्यायला आपल्याला त्यांच्या भूमिकेतच जायला पाहिजे. 🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा
  2. Kharokhar.....ashaach lokaanmule jag chaalta aani ashaannach baghun ya jagaat rahaavasa vaatata.

    Vandan ya maulinna

    उत्तर द्याहटवा
  3. Kharokhar....ashaa lokaanmule jag chaalta aani ashaanmulech ya jagaat rahaavasa vaatata.

    Vandan ya maulinna

    उत्तर द्याहटवा
  4. Kharokhar.....ashaach lokaanmule jag chaalta aani ashaannach baghun ya jagaat rahaavasa vaatata.

    Vandan ya maulinna

    उत्तर द्याहटवा
  5. Kharokhar.....ashaach lokaanmule jag chaalta aani ashaannach baghun ya jagaat rahaavasa vaatata.

    Vandan ya maulinna

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपक्रमांचा विजय असो

 मी रोज घराजवळच्या एका टेकडीवर फिरायला जातो. ही टेकडी तशी प्रसिद्ध आहे. अनेक संस्था सुट्टीच्या दिवशी विविध उपक्रम राबवण्याकरता या टेकडीला निवडतात. आजही एका जुन्या, नामवंत 'क्लब'ने पर्यावरण जपण्याच्या हेतूने प्लास्टिक वापराबद्दल काही उपक्रम आयोजिला होता. क्लब नामवंत, त्यामुळे अर्थातच त्याचे मेम्बर्सही नामवंत, एलिट वर्गातले. बरीच गर्दी होती. बहुतेक मेंबर मराठी होते. कारण इंग्लिशमधे बोलत होते. 'व्हॉट अ डेंजरस धिस प्लास्टिक, यू नो' वगैरे कॉमेंट्स कानावर पडत होत्या. मेम्बरांच्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केलेली दिसत होती. सगळा तामझाम होता.  मला पोचायला थोडा उशीर झाल्यामुळे माझा रोजचा ग्रूप पुढे निघून गेला होता. ही सगळी गर्दी कापत त्यांना गाठण्यापेक्षा वेगळ्या शांत बाजूला जावं असा मी विचार केला. कधी कधी अशी शांततासुद्धा गरजेची असते. त्या शांततेलाही एक आवाज असतो. पक्षी चिवचिवत असतात. झाडं सळसळत असतात. साधं वाळलेलं पानही झाडावरून पडताना एक हलकासा आवाज करत काही सांगून जातं. आज या सगळ्याचा आनंद घेत मी चालत चाललो होतो. आमच्या ह्या टेकडीवरच्या पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून वन...

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो... हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली....  - बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना) - अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल) - सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) - त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा ...

भावलेल्या व्यक्तिरेखा - भवानीशंकर

भवानीशंकर.  साधं सरळ नाव. बघायला गेलं तर नावावरून काहीही बोध होत नाही.   तो एक यशस्वी उद्योजक असतो. भला चांगला व्यवसाय असतो. एकुलती एक मुलगी असते. बंगला, गाडी, नोकरचाकर, सर्व काही असतं. दुर्दैवानं पत्नी निवर्तलेली असते. पण विधवा बहीण घरात असल्यामुळे तशी त्याला मुलीच्या संगोपनाची चिंता नसते. कुठल्याही होतकरू मुलासाठी याहून चांगली बॅटींग पीच असूच शकत नाही. चित्रपटाचा नायक नुकताच सीए झालेला असतो. त्याचे मामा, जे भवानीशंकरचे मित्र असतात, त्याला वरील सगळी माहिती देऊन भवानीशंकरच्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करायला सांगतात. त्याचबरोबर काही टिप्सही देतात. कुठल्याही यशस्वी व्यावसायिकाप्रमाणे भवानीशंकरलाही कुणी वशिला वा ओळख सांगून नोकरी मागितलेली आवडत नाही. तसंच तरुणांनी खेळ, सिनेमे, नाचगाणं यापेक्षा आपल्या कामावर लक्ष द्यावं, असं त्याचं मत असतं. पण... पण सगळ्यात मोठी अट अशी असते की माणसाला 'मिशी' पाहीजे. मिशी ठेवणारा माणूस हा सर्वगुणसंपन्न, बुद्धीमान, कर्तबगार व सर्व गोष्टींसाठी लायक असतो अशी त्याची भावना असते. ह्या मिशीचा भवानीशंकर अतिरेकी दिवाना असतो. इतका की 'जिस किस...