ती मुंबईहून पुण्याला आलेली असते. खास पुणेरी रस्ते व बोळ, कसलाही पत्ता न लागू देता पत्ता सांगायची पुणेरी पद्धत, यामुळे आधीच वैतागलेली ती, त्याला भेटते. त्यानंतर तिची गाठ पडते ती खास पुणेरी लोकांशी व पाट्यांशी. या सगळ्याचा पूर्ण वीट येऊनसुद्धा काम पूर्ण करण्यासाठी ती थोडावेळ पुण्यातच थांबायचं ठरवते. आता तिची पुन्हा गाठ पडते त्याच्याशी.
थोड्याश्या अपरिहार्य परिस्थितीत ती त्याची कंपनी मान्य करते आणि सुरू होतो मुंबई विरुद्ध पुणे असा एक नेहमीचा व आवडीचा वाद. कळत नकळत आपणही त्या वादाचा एक भाग होऊन जातो. पुणे मुंबई वरून सुरू झालेला वाद हळूहळू व्यक्तिगत विषयांकडे वळतो.
तिचा एक ब्रेकअप झालाय तसाच त्याचाही झालाय. दोघंही आपापल्या एक्स बद्दल सांगत असताना तिची अतिशय व्यवहारी, वर्तमानात जगायची, झालं गेलं मागे सोडून पुढे जाण्याची खास मुंबई पद्धतीची व्यक्तिरेखा आपल्यासमोर येते. तर दुसऱ्या बाजूला तो बराचसा स्वप्नाळू, पुणेरी परंपरावादी, वरकरणी खुशालचेंडू, थोडासा आतल्या गाठीचा पण कविमनाचाही.
पुणे शहरातून फिरताना व नंतर सिंहगडावर फिरताना त्या दोघांचा उंदीरमांजरासारखा एकमेकांना खेळवण्याचा खेळ सध्याची लग्नपद्धती, मुलामुलींचा लग्नसंस्थेकडे बघण्याचा दृष्टीकोन, एकत्र कुटुंबपद्धती इत्यादि विषयांवर हलकंफुलकं भाष्य करत जातो.
एका प्रसंगात तो तिला म्हणतो की ही जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे आपण नात्यांना उलगडूच देत नाही. सगळं काही, अगदी आपल्या पार्टनरसकट सगळ्यांना आपण गृहित धरतो. वाद उद्भवतात ते त्यामुळेच. नाती तुटतात तीही त्यामुळेच.
चित्रपटाच्या शेवटच्या पाच मिनिटात आपल्याला कळतं की ती ज्याच्यासाठी पुण्याला आलेली असते तो तोच आहे आणि मुख्य म्हणजे ती कोण आहे हे त्याला माहीत असतं पण तिला त्याचा सुतराम पत्ता नसतो. त्याच्याच शब्दात सांगायचं तर योगायोगाने सुरू झालेला हा योगायोग व मुलगी बघण्याचा एक वेगळा प्रयोग दोन तास केवळ मनोरंजनच करत नाही तर लग्न व त्या अनुषंगाने निर्माण होणारे प्रश्न यावर एक छान भाष्य करून जातो.
स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक राहताना जोडीदाराच्या विचारांचाही आदर करायचा धडा देणारी ही दोघं, तो व ती, मला फारच भावले.
Ⓒ मिलिंद लिमये
🥰🥰🥰👌👌👌mumbai pune mumbai 🌹🌹🌹
उत्तर द्याहटवा👍🏼
हटवाBhaavnya saarkhaach chitrapat aahe toh ...... Nicely summarized
उत्तर द्याहटवाधन्यवाद श्रीपाद
हटवा
उत्तर द्याहटवामराठी चित्रपटांमधील एक सुंदर भट्टी जमलेला हा चित्रपट. त्याची सुंदर मीमांसा या ब्लॉगमधून केली आहे. उंदीर मांजराचा खेळ ही उपमा छान आहे. एका अर्थाने लग्नानंतर नवरा बायकोत हाच खेळ चालतो. त्याचेच लग्नापूर्वीचे एक रूप यात चितारले आहे. हलका-फुलका पण या मुद्द्यावर प्रकाश टाकणारा हा सिनेमा. ब्लॉगमधून यादृष्टीने हाच सिनेमा परत पहिल्याच समाधान!
धन्यवाद सुहास
उत्तर द्याहटवा