मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

किती वानू यांसी...

मागल्या वर्षीच्या लॉकडाऊननंतर अनेक क्लिप्स समाजमाध्यमांवर फिरत आहेत. आपणही अशा अनेक पाहिल्या असतील. पण ज्या दोन क्लिप्सनी मला अनेक दिवस निःशब्द केलं त्या आज तुमच्याशी शेअर करतोय. प्रत्येक वेळी ह्या क्लिप्स पाहिल्यावर 'किती वानू यांसी', किती वाखाणणी करू यांची, हा एकच विचार मनात घोळत रहातो.  एक आहे महामारीच्या उद्रेकात पंढरीला जाता येणार नाही असं सांगणाऱ्या पोलिसालाच पांडुरंग मानून, त्याच्या पाया पडून माघारी निघणारा वारकरी. अनेक दिवस मैलोनमैल चालून आल्यानंतर, फक्त कळसाचे दर्शन घेऊन, 'जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता', असं म्हणणाऱ्या तुकोबांच्या वारकऱ्याची श्रद्धा काय असते ते कळणं, वाटतं तितकं सोपं नाहीये. इथे तर कळसही दिसणं शक्य नाही म्हणताना सहजपणे त्या पोलिसातच पांडुरंग बघणारा हा वारकरी. दुसरी आहे एक कोणी म्हातारी. भिकारीण म्हणावं का तिला? पण क्लिप पाहिल्यानंतर तिला भिकारीण म्हणता येईल? दोन चार दिवस पोटाला अन्न नाही. कुणीतरी एक अनामिक स्वयंसेवक पाण्याची बाटली व अन्नाचं पॅकेट देतो तर, पदराची गाठ सोडवून म्हातारी एक नोट पुढे करते. का? काय नक्की असेल तिच्या मनात? ...

धारा बहती है

बरेचदा विविध क्षेत्रातली थोर थोर माणसं त्यांच्या चेल्यांशी किंवा अनुयायांशी किंवा ज्युनिअर्सशी किंवा सर्वसामान्य लोकांशी बोलताना एखादा शब्द किंवा वाक्प्रचार वापरून जातात. बरेचवेळा असा शब्द वापरताना त्यामागे त्यांचे विचार असतात, काही चिंतन वा मनन असतं, काही विशेष कारणही असतं. अर्थातच समोरचे लोक, यापैकी काहीही विचारात न घेता, तो शब्द प्रमाण मानून, संधी मिळेल तेव्हा वापरायला सुरुवात करतात. काही वेळा असंही होतं की कळपातला कुणीतरी एखादा शब्द फुसकुली सोडल्यासारखा सोडतो आणि बाकीचे तो उचलून धरतात. हे असे शब्द मग संदर्भासहित किंवा संदर्भाविना आपण जाऊ तिथे कानावर पडू लागतात.  मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे तर असे अनेक शब्द गारपिटीसारखे अंगावर येऊन आदळत असतात. ह्यापैकी एकाही शब्दाचा मूळ जनक व त्या शब्दप्रयोगामागची परिस्थिती ही मला माहीतही नसते ना ती त्या शब्द वापरणाऱ्याला माहीत असते. पण हे आपलं उगाच चार शब्द ठोकायचे. मग आजूबाजूचे येरू उगाचच अत्यंत आदराने साहेबाकडे बघू लागतात. साहेबही धर्मराजाच्या रथासारखा चार अंगुळं जमिनीच्या वर तरंगायला लागतो.  यातल्या एका शब्दप्रयोगाने ...

फाउंटन पेन

ही जी एक वस्तू आहे ना तिनं मला कळायला लागल्यापासून, माझ्या मनात एक वेगळी जागा बळकावून ठेवली आहे. आधी वडीलधारी मंडळी हात लावू देत नसत म्हणून उत्सुकता निर्माण झाली. ती आपली एक मानसिकताच असते नाही का? ज्या गोष्टीला मोठी मंडळी 'हात लावलास तर थोतरीत मारीन' म्हणतात, त्या गोष्टीला कधी एकदा हात लावतो असं होऊन जातं. तर मी लहान असताना, माझे आजोबा काही काम करत असताना तिथे लुडबूड करत असे. त्यांच्या टेबलवरच्या इतर कुठल्याही वस्तूला, स्टेपलर म्हणा, पंच म्हणा, पेपरवेट म्हणा, हात लावल्यास ते काहीही बोलत नसत. त्यांची पेन्सिल, खोडरबर ह्या वस्तू तर मी सरळ माझ्या अभ्यासासाठी पळवायचो. त्यालाही त्यांची हरकत नसायची. पण पेनाला हात लावला की वस्सकन ओरडायचे. माझ्या लहानपणी चौथीत गेल्याशिवाय पेन मिळायचं नाही. त्यामुळे पहिली ते तिसरी, एक तर पाटी पेन्सिल नाहीतर शिसपेन्सिल, एव्हढ्यावरच भागवावं लागायचं. त्यामुळे कधी एकदा चौथीत जातोय आणि पेन मिळतंय असं मला झालं होतं. तिसरीचे शेवटचे दोन महिने तर सरता सरत नव्हते.  अखेर आजोबांनी एक दिवस जाहीर केलं, उद्या तुला पेन आणायला जाऊ. रात्रभर झोपेत मला वेगवेगळी पेनं ...

मी पण प्राध्यापक अ

पुलंनी त्यांच्या अजरामर 'तुम्ही मुंबईकर, पुणेकर का नागपूरकर' ह्या लेखात प्रा. अ यांच्या घरच्या पुस्तकांच्या कपाटावर जे वाक्य लिहीलंय ना त्याचा मी पूर्णचित्ते पाईक, शाळेतल्या 'भारत माझा देश आहे' प्रतिज्ञेतला पाईक होतो ना, तसा पाईक आहे. त्या वाक्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. इतकंच नाही तर आता मी ही या प्रा. अ यांचे अनुकरण करायचा विचार करतोय. पहिल्यांदा जेव्हा मी 'खिल्ली' वाचलं ना त्यावेळी हा लेख वाचताना लोळून लोळून हसलो होतो. विशेषतः या वाक्यावर. प्रा. अ हे टिपिकल पुणेरी, विक्षिप्त, तिरसट असणार यात मला शंका नव्हती. त्यामुळे असली वाक्यं त्यांच्या घरात लिहिलेली सापडली तर नवल नव्हतं. पण मग असं काय झालं की अचानक या वाक्याच्या मी प्रेमात पडलो? गेली अनेक वर्षं मी जसं शक्य होईल तसं पुस्तकं विकत घेत असतो. त्यामुळे बहुतेक सर्व वाचकप्रिय लेखकांची पुस्तकं तर संग्रही आहेतच. पण अनेक पर्यायानं अप्रसिद्ध वा कमी वाचकप्रिय लेखकांची पुस्तकंही घेतली गेली. अर्थातच मी ती वाचलीही आहेत. मात्र आज जे लिहायला बसलोय त्याचा उद्देश स्वताचंच कौतुक करून घेणे असा नसून 'पुस्तक वाचायला मागणारे ...

सायकल

आमच्या सोसायटीला जवळजवळ दहा वर्षं झाली असतील आता. रहायला आलो तेव्हा शाळेत जाणारी चिल्लीपिल्ली आता कॉलेजात जायला लागली आहेत. आधी ही मंडळी छोट्या छोट्या सायकली चालवायची. बरेच वेळा पडू नयेत म्हणून मागच्या चाकासोबत अजून दोन छोटी चाकं असायची. थोडी मोठी झाल्यावर त्यांना गिअरच्या सायकली मिळाल्या. मग कुणाच्या सायकलला किती गिअर, विली मारता येते का, स्लो सायकलींग इ. भानगडीच्या जोडीला जवळपासच्या दुकानातून आईला काहीबाही आणून देणे हा एक कार्यक्रम वाढला. मग काही दिवसांनी सायकलवरून शाळेत जायची क्रेझ होती. दहावीची परीक्षा होता होता अक्कल घोड्याच्याही पुढे धावायला लागली तशी मग स्कुटी चालवायची हौस सुरू झाली. मग वडील ऑफिसला गेले की हळूच आईला मस्का मारून एक चक्कर मारायची. आणि मग लायसन्स मिळाल्यावर तर काय फक्त आणि फक्त मोटरसायकलच. ह्या सगळ्या प्रकारात 'मी अधूनमधून चालवीन सायकल' हे बापाला (थोडंसं खेकसून) दिलेलं आश्वासन व ती सायकल, कधी कोपऱ्यात जाऊन पडले ते बापाला आणि पोराला, दोघांनाही कळलं नाही. हल्ली थोरल्याची सायकलच काय पण कुठलीच वस्तू धाकट्यानं वापरायची पद्धत नसल्यामुळे थोरल्याची सायकल असून...

यंदा तो आलाच नाही

परवा माझ्या प्राथमिक शाळेतल्या एका मित्राचा फोन आला. लॉकडाऊनमुळे दोघांनाही बराच वेळ होता. अनेक वर्षांनी खूप गप्पा झाल्या. बोलता बोलता तो म्हणाला, अरे मध्यंतरी तुक्या गेला. तुक्या आमचा वर्गमित्र. एकेका यत्तेत दोन दोन तीन तीन वर्ष काढल्यामुळे चौथीत असताना जेव्हा तो आमच्या वर्गात आला, खरं सांगायचं तर आम्ही त्याच्या वर्गात गेलो, तेव्हा आमच्यापेक्षा दुप्पट उंचीचा व लांबीरुंदीचा होता. आम्ही चौथी पास झालो त्यावर्षी तो परत नापास झाला. तुक्याचा बाप म्हादूनाना. झालं तेव्हढं शिक्षण बास झालं असं म्हणून असं म्हणून म्हादूनानानं त्याला कुणाच्यातरी ओळखीतनं कुठेतरी पिंपरी चिंचवडकडे कारखान्यात लावून दिला. रोज जायला यायला लांब पडतं या सबबीवर तुक्या तिकडंच कुठेतरी राहायला गेला. नंतर फारसा कधी दिसला, भेटलाही नाही. म्हादूनाना मात्र आमच्याच गल्लीत रहात होता. आमच्या गल्लीतलं एक पोर असं नसेल ज्याला म्हादूनाना माहीत नाही. याचं कारण म्हणजे म्हादूनाना वह्यापुस्तकांना अतिशय छान, सुबक अशी कव्हरं घालून द्यायचा. कव्हराचे कागद ज्यानं त्यानं आपापले आणायचे. मग कुणी जुनी वर्तमानपत्रं घेऊन यायचा, कुणी ...

कोरोना एम्प्लॉयमेंट एक्सचेंज

एकदाचे ते परप्रांतीय मजूर आपापल्या मूळ गावी रवाना झाले.  बरेच जण पोचलेसुद्धा म्हणे.... (टाळ्या) भारतीय रेल्वेने फारच छान व्यवस्था केली म्हणतात....(प्रचंड टाळ्या) लौकरच लाॅकडाऊन संपून उद्योगधंदे चालू होतील व अर्थचक्राचा गाडा हळूहळू मार्गी लागेल....(टाळ्यांचा तुफानी कडकडाट) अमक्यातमक्याचा विजय असो... झालं टाळ्या वाजवून? संपलं घोषणा देऊन? आता सांगा, ह्या चालू होणाऱ्या उद्योगधंद्यांमधे काम करायला कामगार कुठून आणणार आहात? का पुन्हा एकदा भारतीय रेल्वे अशीच छान व्यवस्था करून त्यांना परत आणणार? आणि जरी समजा तशी व्यवस्था केलीच तरी गेल्या चाळीस दिवसात झालेली आबाळ, अवहेलना व मनस्ताप लक्षात घेता किती जण परत येतील? बहुतेकांचा सूर ‘गड्या अपुला गाव बरा’ असाच असू शकेल. एवढा सगळा द्राविडी प्राणायाम व पैशाचा जाळ करण्यापेक्षा त्या पैशातून आहे त्या जागी या कामगारांची नीट व्यवस्था लावली असती तर सगळे तिथेच राहीले असते. उद्या सुरू होताना सर्व उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू झाले असते. सर्व पातळ्यांवरचे सत्ताधारी व नोकरशहांच्या हे लक्षात आले नसेल? का सामान्य माणसाला समजण्यापलिकडचे काही ‘भानग...