आमच्या सोसायटीला जवळजवळ दहा वर्षं झाली असतील आता. रहायला आलो तेव्हा शाळेत जाणारी चिल्लीपिल्ली आता कॉलेजात जायला लागली आहेत. आधी ही मंडळी छोट्या छोट्या सायकली चालवायची. बरेच वेळा पडू नयेत म्हणून मागच्या चाकासोबत अजून दोन छोटी चाकं असायची. थोडी मोठी झाल्यावर त्यांना गिअरच्या सायकली मिळाल्या. मग कुणाच्या सायकलला किती गिअर, विली मारता येते का, स्लो सायकलींग इ. भानगडीच्या जोडीला जवळपासच्या दुकानातून आईला काहीबाही आणून देणे हा एक कार्यक्रम वाढला. मग काही दिवसांनी सायकलवरून शाळेत जायची क्रेझ होती. दहावीची परीक्षा होता होता अक्कल घोड्याच्याही पुढे धावायला लागली तशी मग स्कुटी चालवायची हौस सुरू झाली. मग वडील ऑफिसला गेले की हळूच आईला मस्का मारून एक चक्कर मारायची. आणि मग लायसन्स मिळाल्यावर तर काय फक्त आणि फक्त मोटरसायकलच. ह्या सगळ्या प्रकारात 'मी अधूनमधून चालवीन सायकल' हे बापाला (थोडंसं खेकसून) दिलेलं आश्वासन व ती सायकल, कधी कोपऱ्यात जाऊन पडले ते बापाला आणि पोराला, दोघांनाही कळलं नाही. हल्ली थोरल्याची सायकलच काय पण कुठलीच वस्तू धाकट्यानं वापरायची पद्धत नसल्यामुळे थोरल्याची सायकल असून...
मन आणि च'मन'चिडी, कुठल्या दिशेला उडतील, ह्याचा नेम नाही. ह्या ब्लॉग द्वारे मनात येणारे कुठलेही विचार तुमच्याशी शेअर करणार आहे. एखादा लेख, फोटो, प्रसंग, कविता, बातमी, काहीही, कधीही, कुठेही, काय जे वाटेल ते.... आवडल्यास कृपया 'लाइक' करा व तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.